कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे भारतातील शेतीकरी बांधवांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो. मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास खऱ्या अर्थाने शेतकरी एक पाऊल प्रगतीकडे वाटचाल करतील. मल्चिंग पेपर च्या मदतीने शेती हा शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपर च्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही. तणांची वाढ होत नसल्याने खर्चात कपात होते. दर्जेदार उत्पादन मिळते,यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो. निश्चितच याचा फायदा शेतकरी बांधवांना होतो. मल्चिंग च्या मदतीने भाजीपाल्यासह अनेक पिकांची शेती करणे शक्य आहे. यामध्ये भाजीपाला पिकांपासून ते फुल पिकांपर्यंत सगळी पिके मल्चिंग पेपर च्या मदतीने घेता येतात.
पिकांनुसार मल्चिंग पेपर कसा वापरावा?
| पिके | मल्चिंग पेपर अंथरण्याची पद्धत |
| भेंडी | ४ फुटांवर दोन ओळी बेड |
| वांगे | ५ फूट बेड |
| टोमॅटो | ८ फूट जोडओळ लागवड |
| ढोबळी मिरची | ५ फूट जोडओळ |
| मिरची | ५ फूट जोडओळ |
| भुईमूग | दोन ओळीतील अंतर-४ फूट |
| कलिंगड | ८ फूट अंतरावर अथवा जाडओळ अंतरावर दोन बेड मधले अंतर १५ फूट |
| काकडी | ५ ते ८ फूट बेड |
| खरबूज | ५ फूट सिंगल ओळ बेड, ८ फूट डबल ओळ बेड |
| दोडका | ५ ते ७ फूट मांडव |





0 comments:
Post a Comment