Thursday, July 12, 2018

मका उत्पादनावर जाणवतील तापमानवाढीचे विपरीत परिणाम

हवामानातील बदलांचे एकूण अंदाज पाहता तापमानातील वाढीचे परिणाम ईशान्य अमेरिकेत अन्य भागांच्या तुलनेमध्ये अधिक जाणवण्याची शक्यता संशोधक व्यक्त करत आहेत. सन २०५० पर्यंत या विभागातील मका पीक आणि डेअरी उद्योगावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

पेनसिल्व्हानिया राज्य विद्यापीठातील कृषिशास्त्र महाविद्यालयातील पीक उत्पादन पर्यावरणशास्त्र विषयाच्या साहाय्यक प्रा. हीदर कार्स्टेन व त्यांच्या सहकाऱ्यांनी हवामानातील बदलांचा ईशान्य अमेरिकेतील मका पिकाची वाढ आणि डेअरी उद्योगाच्या वाढीवर होणारा परिणाम या विषयावर अभ्यास केला आहे. नऊ जागतिक हवामान मॉडेल्सच्या माहितीसाठ्यावर स्थानिक माहितीचा अंदाज मिळवून, सायराकस, न्यू यॉर्क, पेन्निसिल्वानिया येथील स्टेट कॉलेज आणि लॅण्डीजव्हिले येथील मका उत्पादनावरील परिणामांचा अंदाज घेतला. येत्या काळामध्ये अतिउष्णतेच्या दिवसांची संख्या आणि वेळ वाढणार असून, पिकांना पाण्याची कमतरता भासू शकते.

  • कार्स्टेन यांच्या मते, वाढत असलेल्या तापमानामुळे उत्तर आणि मध्य अमेरिकेतील मका पिकावर फारसा विपरीत परिणाम दिसणार नाही. मात्र, दक्षिणेकडील काही भागामध्ये मका पिकाच्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. लॅंकेस्टर कौंटी, पेन्निसिल्वानिया येथील शेतकऱ्यांनी मका उत्पादनाच्या आपल्या पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.
  • वातावरणातील बदलांच्या अंदाजानुसार लॅंकेस्टर कौंटी येथील डेअरी उद्योगालाही भीती असून, चाऱ्याची टंचाई भासू शकते.
  • प्लॉस वन या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित निष्कर्षानुसार, लॅंकेस्टर कौंटीतील शेतकऱ्यांनी मक्याची पेरणी लवकर करून, योग्य वेळी सिंचनाचा वापर करण्याची आवश्यकता आहे. सध्या मक्याच्या पूर्ततेसाठी ते बहुतांश वेळा मध्य पश्चिमेतील भागांवर अवलंबून असतात.
  • ऑबर्न विद्यापीठातील साहाय्यक प्रा. रिषी प्रसाद यांनी सांगितले, की विश्‍लेषणात आढळल्यानुसार, २१ व्या शतकाच्या अखेरीला ईशान्येतील मका उत्पादनामध्ये कमी वसंत व गोठवणारी थंडी असेल. तापमानामध्ये वेगाने होत असलेल्या वाढीमुळे पक्वतेसाठीचा कालावधी कमी होईल. लँकेस्टर कौंटी येथील प्रति तापमानामध्ये उच्च तापमानाच्या (९५ अंश फॅरनहीटपेक्षा अधिक) दिवसांचे प्रमाण अधिक राहील. हे तापमान नेमके वाढीच्या स्थितीमध्ये असल्यास सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासू शकते. वाढीच्या शेवटच्या स्थितीमध्ये विशेषतः पराग तयार होताना मका पिके ही तापमानासाठी अधिक संवेदनशील असतात. भविष्यामध्ये ईशान्येकडील मका उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
  • दोन कारणे ः (१) ईशान्येकडील भाग हा डेअरी उद्योगासाठीही ओळखला जातो. या उद्योगासाठी चारा म्हणून मका आवश्यक आहे. सन २०१७ मध्ये अमेरिकेत न्यू यॉर्क आणि पेन्सिल्वानिया ही राज्ये दूध उत्पादनामध्ये अनुक्रमे तिसऱ्या आणि सातव्या क्रमांकावर होती. (२) ईशान्येकडील भाग हा वेगाने उष्ण होणाऱ्या प्रदेशामध्ये आहे. देशातील अन्य भागातील तापमान २०५० मध्ये ३.६ अंश फॅरनहीटने वाढण्याची शक्यता आहे, त्याच वेळी ईशान्येतील तापमान ५.४ अंश फॅरनहीटने वाढण्याची शक्यता व्यक्त अंदाजानुसार दिसते.
  • उत्तर किंवा मध्य प्रांतामध्ये तापमानातील अल्प वाढीमुळे उत्पादनावर फारसा परिणाम होणार नसला तरी सिंचनासाठी पाण्याचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता असेल.  
  • कार्स्टेन यांनी सांगितले, की आमच्या विश्लेषणानुसार व्यवस्थापनाच्या पद्धती आणि धोरणांमध्ये बदल आवश्यक असून, त्यात पेरणीच्या तारखा बदलणे अंतर्भूत आहे. अन्यथा, उष्णता आणि दुष्काळी स्थितीचा सामना पिकांना करावा लागेल. भविष्यामध्ये संशोधनामध्ये स्थानिक पातळीवरील सूक्ष्मातिसूक्ष्म बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागेल. नेमके बदल आणि सुधारणांना कवेत घेणारी धोरणेही राबवावी लागतील, तरच उत्पादनामध्ये शाश्वतता आणणे शक्य होईल.
News Item ID: 
18-news_story-1531400718
Mobile Device Headline: 
मका उत्पादनावर जाणवतील तापमानवाढीचे विपरीत परिणाम
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural news in marathi,news regarding effects of increasing temparature on maize crop, Agrowon, Maharashtra
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
हवामान, विभाग, Sections, विषय, Topics, वन, forest, सिंचन, नासा, दूध, सामना, face

0 comments:

Post a Comment