महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दूध भुकटी निर्यातीसाठी सरकारने अनुदान जाहीर केल्यामुळे निर्यातीत तब्बल नऊ पट वाढ होण्याची शक्यता आहे; त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भुकटीचे दर दबावात येण्याची चिन्हे आहेत, असे उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.
भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश आहे. सरकारच्या निर्यात प्रोत्साहन धोरणामुळे २०१८-१९ या हंगामात देशातून १ लाख टन दूध भुकटी निर्यात होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या चार वर्षांच्या काळात अतिरिक्त पुरवठ्यामुळे दूध भुककटीचे दर निम्म्यावर आले आहेत. भारतातील ताज्या घडामोडींमुळे या दरांवर आणखी परिणाम होण्याची शक्यता असल्याचे विश्लेषक व उद्योगातील सूत्रांनी सांगितले.
देशात दुधाचे दर गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पातळीला पोचले होते. त्यामुळे दूध भुकटीचे साठे मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहेत. निर्यात वाढण्याची शक्यता असल्याने हे साठे कमी होण्याची चिन्हे आहेत.
दुधाला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये राज्य सरकारांनी दूध भुकटी निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपयांचे अनुदान जाहीर केले. तसेच केंद्र सरकारनेही अतिरिक्त १० टक्के निर्यात अनुदान देण्याचा निर्णय घेतला. ‘‘देशातून फारशी निर्यात होत नव्हती. सरकारच्या मदतीमुळे येत्या काही महिन्यांत निर्यात पुन्हा वेग घेईल,’’ असे गुजरात सहकारी दूध मार्केटिंग फेडरेशन लि.चे (अमूल) व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी म्हणाले. देशातून २०१८-१९ या हंगामात १ लाख टन दूध भुकटी निर्यात होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या हंगामात ११ हजार ५०० टन भुकटी निर्यात झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम
भारतातून तुटपुंजी निर्यात होत असल्याने दूध भुकटी निर्यातीच्या बाजारपेठेत देशाचे स्थान फारसे महत्त्वपूर्ण मानले जात नव्हते. अमेरिकी कृषी विभागाने (यूएसडीए) भारत २०१८ मध्ये केवळ १५ हजार टन भुकटी निर्यात करेल, असा अंदाज वर्तविला होता. त्याच वेळी न्यूझीलंड आणि अमेरिकेतून अनुक्रमे ४ लाख १० हजार टन आणि ७ लाख २० हजार टन भुकटी निर्यातीचे अनुमान होते. परंतु भारतात सरकारने अनुदान दिल्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक भुकटी निर्यात होण्याची शक्यता असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा वाढून किमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक आणि निर्यातीच्या बाजारपेठेतील दरांमध्ये मोठी तफावत असल्याने भारतीय डेअरी कंपन्या दूध भुकटीची फारशी निर्यात करत नव्हत्या; परंतु आता सरकारच्या अनुदानामुळे ही तफावत कमी झाली आहे, असे पराग मिल्क अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी सांगितले. सरकारने अनुदान देऊनही दूध भुकटी निर्यातीत कंपन्यांना तोटा सहन करावा लागले, असे शहा यांचे म्हणणे आहे. दरम्यान, देशात शिल्लक दूध भुकटीचा साठा तीन लाख टनांवर पोचला असून, निर्यात वाढली तरी हा प्रचंड साठा मोठ्या प्रमाणावर कमी होणार नाही, असे मत इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी व्यक्त केले. शालेय पोषण आहारासारख्या योजनेत दुधाचा समावेश करून स्थानिक मागणी वाढविण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे, असे देवेंद्र शहा म्हणाले.

0 comments:
Post a Comment