नागपूर : धार्मिक सण-उत्सवाच्या परिणामी ब्रॉयलर कोंबडी आणि अंडी मार्केटमध्ये मंदीचे सावट असून, दिवाळीपर्यंत ही मंदी कायम राहणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे. सध्या स्थानिक मागणी घटल्याने देशांतर्गत उपलब्ध बाजारपेठांवर पोल्ट्री व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित केले आहे.
श्रावण त्यानंतर गणपती, दुर्गा, दिवाळी असे हिंदूचे सण येतात. या कालावधीत बहुतांश कुटुंबीय मांसाहार वर्ज्य करतात. त्याचा परिणम ब्रॉयलर आणि अंडी बाजारावर थेट होतो. सध्या किरकोळ बाजारात चिकन १४० रुपये किलो आहे. बकरीच्या मटनाचे दर मात्र ४५० रुपये किलोवर स्थिर असल्याचे मातोश्री पोल्ट्रीचे संचालक रवींद्र मेटकर यांनी सांगितले. ब्रॉयलरला राज्यात ३० टक्क्यांनी मागणी घटली आहे. सण उत्वसवांपूर्वी सरासरी ६८ ते ६९ रुपये सरासरीचा दर असलेल्या ब्रॉयलरचे दर ६५ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, अमरावतीचे दर वेगवेगळे असतात. राज्याच्या मागणीचा ट्रेंड ठरलेला आहे. महाराष्ट्रात ब्रॉयलरला इतरवेळीदेखील मागणी कमीच राहते. परंतू सण-उत्सवाच्या काळात ती अधिकच घटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ब्रॉयलरला सध्या मध्य प्रदेशातून वाढती मागणी असल्याने त्या ठिकाणी राज्यातून सप्लाय केला जात आहे.
अंड्यांच्या दरात मोठी घसरण
राज्यात अंड्यांनादेखील मागणी घटली आहे. अंड्याचे दर सद्यस्थितीत ३१५ ते ३२० रुपये शेकडा प्रमाणे आहेत. याउलट शेकडा ३३० रुपये उत्पादन खर्च आहे. परिणामी यातून फारसे उत्पन्न आजच्या घडीला होत नसल्याचे रवींद्र मेटकर सांगतात.
बहुतांश पोल्ट्री व्यावसायिकांकडे स्वतःची फिडमील असल्याने त्यावरील खर्चाच्या बचतीमधून तोटा कमी करणे शक्य होते. सण- उत्सवापूर्वी ४५० रुपये शेकड्यापर्यंत अंड्याचे दर पोचल्याची माहिती मेटकर यांनी दिली. सध्या अंड्यांना देशाची राजधानी दिल्लीतून जास्त मागणी असून झाशी, भोपाल, इंदूर या भागातही पुरवठा वाढल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती पोल्ट्री व्यवसायाचे मोठे हब असून या ठिकाणी ८ लाख कोंबड्यापांसून रोज अंड्यांचे उत्पादन होते. सरासरी ९० टक्के अंडी मिळतात.

0 comments:
Post a Comment