नवी दिल्ली ः योग गुरू बाबा रामदेव यांच्या "पतंजली आयुर्वेद'ने आता डेअरी उत्पादन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने "समर्थ भारत, स्वस्थ भारत' या अभियानांतर्गत गाईचे दूध, दही, बटर मिल्क आणि पनीरसह पाच नवीन उत्पादने नुकतीच लॉंच केली. कंपनी फ्रोजन फूड कॅटॅगरीअंतर्गत ग्रीन पीस, मिक्स्ड वेज, स्वीट कॉर्न तसेच फ्रेंच फ्राइज ही उत्पादनेही बाजारात दाखल करणार आहे. ही उत्पादने बाजारातील इतर उत्पादनांच्या तुलनेत 50 टक्क्यांनी स्वस्त असतील.
यामागे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, तसेच सामान्यांना वाजवी दरात दर्जेदार उत्पादनांचा पुरवठा असा दुहेरी हेतू आहे. विजेबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कंपनीने विविध प्रकल्पांमध्ये सौरऊर्जानिर्मिती काम हाती घेतल्याची माहितीही कंपनीने या वेळी दिली. दरम्यान, कंपनीने "दुग्धमित्र' (पशू आहार) आणि "दिव्य जल' या उत्पादनांचीही घोषणा केली.

0 comments:
Post a Comment