मुंबई : राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन पेंडच्या खरेदीसाठी चीनने पुढाकार घेतला असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी चीनचे कॅान्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (ता.१०) रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
शेती उत्पादनांची चीनमध्ये आयात आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी चीन उत्सूक असल्याचे यावेळी टॅन्ग गुओकाई यांनी सांगितले. चीनसमवेत देवाण-घेवाण अधिक विकसित करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल, असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चीनने यासंदर्भात घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळणार आहे.
राज्य कृषिमूल्य आयोग आणि बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंज यांच्या पुढाकाराने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रथमच पुढाकार घेतल्याचे दिसले. या वेळी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, बाॅम्बे स्टाॅक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान आदी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की महाराष्ट्र हे देशातील एक प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहे. शिवाय राज्यात सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योगही विकसित असल्याने चीन देशाला मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेंडचा पुरवठा करता येऊ शकेल. केंद्र शासनानेही या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सोयाबीन पेंडला १० टक्के निर्यात प्रोत्साहन अनुदान जाहीर केले आहे. यामुळे सोयाबीन पेंडच्या खरेदीसाठी चीनने दाखविलेल्या उत्साहामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अधिक भाव मिळेल. पाशा पटेल म्हणाले, की चीन ही महाराष्ट्रातील सोयाबीन पेंडच्या विक्रीसाठी खात्रीची बाजारपेठ ठरू शकेल.

0 comments:
Post a Comment