पुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या नवरात्र आणि दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झेंडू आणि शेवंतीला चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे बाजार समितीमध्ये नवरात्रात झेंडू एका किलोसाठी सरासरी ५० रुपये, तर शेवंतीला ७५ रुपये दर मिळाला. या ९ दिवसांमध्ये फूल बाजाराची उलाढाल सुमारे ७ काेटी रुपये झाल्याचे फूल विभाग प्रमुख प्रदीप काळे यांनी सांगितले. तर दिवाळीत झेंडूला १०० रुपयांपर्यंत दर मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
गणेशाेत्सवामध्ये फुलांना दर न मिळाल्याने शेतकरी निराश झाला हाेता. गणेशाेत्सवानंतर नवरात्रात चांगले दर मिळतील, या आशेवर फूल उत्पादक शेतकरी हाेते. याबाबत बाेलताना संताेष हाके (रा. भरतगाव, यवत) म्हणाले, ‘नवरात्र आणि दिवाळीच्या नियाेजनानुसार अर्धा एकर राजा शेवंतीची लागवड केली आहे. नवरात्रात ७५ ते १२५ रुपये किलाेला दर मिळाले. तर दसऱ्याला १२५ रुपये दर मिळाले. हे दर चांगले आणि परवडणारे हाेते. दिवाळीत २५० रुपयांपर्यंत दर मिळतील अशी आशा आहे.’
दीपक तरटे (रा. बावधन, वाई) म्हणाले, ‘दसरा आणि दिवाळीसाठी अर्धा एकर झेंडू लावला आहे. नवरात्रात ४० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळाला. सर्वाधिक दर दसऱ्याच्या आदल्या दिवशी ७० रुपये मिळाला. गणपतीमध्ये हाच दर ६ ते २० रुपये हाेता. गणपतीच्या मानाने नवरात्रात चांगले दर मिळाले. दिवाळीत १०० रुपयांपेक्षा जास्त दर मिळतील, असा अंदाज आहे. कारण सध्या फुलांवर दव पडतय यामुळे फुले खराब हाेत आहे. तर पाऊस नसल्याने झेंडूची लागवड कमी झाली आहे. यामुळे उत्पादन कमी हाेणार असून, दर १०० पेक्षा जास्त मिळेल.’
रवींद्र जाधव (रा. धामणखेल, ता. जुन्नर) म्हणाले, ‘दसरा दिवाळीसाठी साडेतीन एकर झेंडूची लागवड केली हाेती. नवरात्रात २५० क्रेट फुले दादर येथील फुलबाजारात पाठवली हाेती. या वेळी ४० ते ६० रुपये दर मिळाले. मिळालेले दर समाधानकारक हाेते. दिवाळीत हेच दर ८० ते १०० रुपयांपर्यंत असतील.’
नवरात्रातील हंगामाबाबत बाेलताना आडते सागर भाेसले म्हणाले, ‘नवरात्रात झेंडू आणि शेवंतीला सरासरी चांगले दर मिळाले. नवरात्रीच्या आदल्या दिवशी फुलांची मागणी वाढली हाेती. यानंतर दसऱ्याला झेंडूला ४० ते ६० रुपये दर, तर शेवंतीला ६० ते १५० रुपये किलो दर मिळाला.

0 comments:
Post a Comment