Monday, November 12, 2018

आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

मिजमाशी

  • प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर, मोहोरावर तसेच लहान फळांवर आढळतो.
  • मादी माशी सालीच्या आतमध्ये अंडी घालते.
  • अळ्या बाहेर पडल्यानंतर पेशींवर आपली उपजीविका करतात, परिणामी त्या ठिकाणी बारीक, फुगीर गाठ तयार होते.
  • पूर्ण वाढलेली अळी गाठीला छिद्र पाडून जमिनीवर पडते. शेंडे जळतात त्यामुळे मोहोरदेखील गळतो किंवा वाळतो. मोहोराची दांडी वेडीवाकडी होते.
  • प्रादुर्भाव लहान फळांवर झाल्यावर वाटाण्याच्या आकाराच्या फळाची गळ होते.  

उपाययोजना
झाडाखाली काळे प्लॅस्टिक अंथरावे. झाडावरून पडणाऱ्या अळ्यांना प्लॅस्टिकवर पडल्यामुळे कोषावस्थेत जाता येत नाही. जमिनीत जाता न आल्याने मरतात.

शेंडा पोखरणारी अळी

  • अळी पालवीच्या तसेच मोहोराच्या दांड्याला छिद्र पाडून आत शिरते व आतील भाग पोखरून खाते.
  • किडग्रस्त फांदी तसेच मोहोर सुकून जातो.
  • फांद्यावर गाठी निर्माण होतात व अशा फांद्या अशक्त राहतात.
  • या किडीच्या नियंत्रणासाठी सुरवातीस प्रादुर्भाव कमी असताना कीडग्रस्त पालवी किंवा मोहोर किडीच्या अवस्थेसह काढून नष्ट करावी.
  • किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर
  • डायक्लोरव्हॉस (७६ टक्के प्रवाही) १ मिलि. (सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाही, मात्र अॅग्रेस्को शिफारस आहे.)

एकात्मिक उपाययोजना

  • आंबा मोहोराची तुडतुडे व इतर किडींची जिज्ञासूपणाने सखोल माहिती करून घेणे गरजेचे आहे.  झाडाच्या फांद्यांची विरळणी करावी, जेणेकरून सूर्यप्रकाश आत पोचेल व हवा खेळती राहील. कारण जास्त पालवी व फांद्या असल्यास असे वातावरण तुडतुड्यांच्या व इतर किडींच्या वाढीस पोषक असते. कीटकनाशकांचे फवारे आतमध्ये पोचत नाहीत.
  • खतांचा संतुलित वापर करावा. नत्र खताच्या मात्रा जास्त झाल्यास झाडास वारंवार पालवी येऊन फांद्या जास्त येतात. असे वातावरण किडींच्या वाढीस पोषक असते.
  • ज्या ठिकाणी मिजमाशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर आहे, अशा ठिकाणच्या झाडाखालची जमीन शक्य असल्यास नांगरावी किंवा खोदावी किंवा झाडाखाली काळे प्लॅस्टिक टाकावे. मिजमाशीच्या अळ्या कोषावस्थेत जाण्यास अडथळा येऊन प्रसार कमी होतो.

फवारणी करताना

  • कीटकनाशकांच्या वेळापत्रकानुसार फवारण्या कराव्यात. तुडतुड्यासह विविध किडींमध्ये कीटकनाशकास प्रतिकार क्षमता वाढणार नाही. फवारणी करताना कीटकनाशक योग्य प्रकाणात मोजून घ्यावीत.
  • फवारा तुषार पद्धतीने झाडावर सर्व ठिकाणी पोहोचेल, अशा पद्धतीने करावा. त्यासाठी बांबूच्या काठीचा उपयोग करावा.
  • बागेतील हापूस किंवा रायवळ, मोहोरलेली किंवा न मोहोरलेली सर्व झाडे फवारून घ्यावीत. फवारणी वेळच्यावेळी करावी.

 : डॉ. आनंद नरंगलकर (विभाग प्रमुख),  ९४०५३६०५१९
 : डॉ. बी. डी. शिंदे (सहायक प्राध्यापक), ८००७८२३०६०
 : डॉ. अंबरीष सणस (संशोधन सहयोगी), ९९६०३३२३७०

(कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

News Item ID: 
18-news_story-1542026545
Mobile Device Headline: 
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon, mango mijmashi, shenda pokharanari ali
Author Type: 
External Author
डॉ. आनंद नरंगलकर, डॉ. बी. डी. शिंदे, डॉ. अंबरीष सणस
Search Functional Tags: 
कीटकनाशक, खत, Fertiliser, हापूस, रायवळ, विभाग, Sections, बाळ, baby, infant, कोकण, Konkan, कृषी विद्यापीठ, Agriculture University
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment