जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.१४) सीताफळाची १८ क्विंटल आवक झाली. सीताफळास किमान २५०० व कमाल ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सरासरी दर ३५०० होता. आवक औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसर, जामनेर, पाचोरा, एरंडोल येथून होत आहे. आवक स्थिर असून, दरही टिकून असल्याची माहिती मिळाली.
बाजारात बुधवारी बोरांची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते १७०० व सरासरी १४०० रुपये दर मिळाला. लिंबूची आवक नऊ क्विंटल, तर दर १५०० ते २५००, सरासरी १८००, पपईची आवक पाच क्विंटल, तर दर २०००, भेंडीची आवक २० क्विंटल, तर दर १५०० ते २१०० व सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कोबीची ३२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर होता. बटाट्याची ३६० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ११०० ते १५१५ व सरासरी १३८५ रुपये दर मिळाला. संत्र्याची १३ क्विंटल आवक, तर दर ६०० ते १२०० व सरासरी ९०० रुपये होता. आल्याची (अद्रक) ११० क्विंचल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते ५५०० व सरासरी ४५०० रुपये दर मिळाला.
आवळ्याची सात क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ३००० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. मेथीची १५ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ५०० ते १५०० व सरासरी १०००, पालकची चार क्विंटल आवक, तर दर २१००, टोमॅटोची ३७ क्विंटल आवक, तर दर ४०० ते ८०० व सरासरी ६०० रुपये होता. वाल शेंगांची नऊ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० रुपये दर मिळाला. वांग्यांची ३१ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ९०० ते १५०० व सरासरी ११०० रुपये दर होता. हिरव्या मिरचीची ५३ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ११०० ते १४०० व सरासरी १२०० रुपये दर मिळाला. लाल कांद्याची २२०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४५० ते १४०० व सरासरी १२०० रुपये दर मिळाला.

0 comments:
Post a Comment