Sunday, November 11, 2018

नाशिकला होणार कांदा क्लस्टर

नाशिक - कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तीन पिकांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे क्लस्टर साकारले जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्याद्वारे प्रत्यक्ष लाभ मिळेल, अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली.

कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तिन्ही पिकांचे दर नेहमीच कमी-अधिक होत असल्याने त्याचा परिणाम ग्राहक आणि शेतकरी या दोन्ही घटकांवर होतो. त्यामुळेच हा विषय राष्ट्रीय राजकारणाच्‍याही अलीकडे महत्त्वाचा भाग बनला आहे. हीच बाब ओळखून केंद्रीय कृषी प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ''ऑपरेशन ग्रीन'' योजना हाती घेतली आहे. त्याद्वारे चांगल्या दर्जाच्या पिकांची लागवड, उत्पादन, उत्तम साखळी, साठवणुकीसाठी चांगले पर्याय आणि देशभरातील दरांवर नियंत्रण हे सारे करणे शक्य होणार आहे. 

कांद्यासाठी नाशिक, कर्नाटकच्या गदग आणि धारवाड, गुजरातच्या भावनगर आणि बिहारच्या नालंदा येथे क्लस्टर विकसित केले जाणार आहेत.

क्लस्टरसाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. सहकारी संस्था, शेतकऱ्यांचे गट, शेतकरी संघटना यापैकी कुणीही या क्लस्टरसाठी अर्ज करू शकणार आहे. वितरण व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच या पिकांवर आधारित उद्योगांनाही चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सात राज्यांत टोमॅटोसाठी क्लस्टर 
टोमॅटोसाठी चित्तूर आणि अनंतपूर (आंध्र प्रदेश), कोलार आणि छिक्कबल्लापूर (कर्नाटक), मयूरभंज आणि किओन्झर (ओरिसा) आणि साबरकांथा (गुजरात) येथे तसेच बटाट्यासाठी आग्रा, फिरोझाबाद, हथरस, अलिगढ, फारुखाबाद, कन्नौज (उत्तर प्रदेश), हुगळी आणि पूर्व वर्धमान (पश्चिम बंगाल), नालंदा (बिहार) येथे क्लस्टर विकसित केले जाणार आहे.

नाशिकच्या कांद्याला नुकताच जी आय टॅग मिळाला आहे. देशाच्या निर्यातीमध्ये नाशिकच्या कांद्याचा सर्वाधिक वाटा आहे. नाशिकमध्ये कांद्याचे क्लस्टर होणार असल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. यामुळे मागणी वाढल्यास व्हरायटीही येऊ शकेल. हे क्लस्टर नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेटच आहे.
- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड

News Item ID: 
51-news_story-1541926322
Mobile Device Headline: 
नाशिकला होणार कांदा क्लस्टर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Onion Cluster in Nashik
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कांदा, Nashik, टोमॅटो, Machine, Initiatives, Politics, मंत्रालय, कर्नाटक, गुजरात, बिहार, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिवाळी, शेती, कांदा लागवड तंत्रज्ञान, कांदा साठवणूक
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment