सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १३) वाटाणा दर सुधारले असून वांगी, ढोबळी मिरची, कारली, गवारीच्या आवकेत वाढ झाली आहे. वाटाण्याची दोन क्विंटल आवक झाली असून, दहा किलो वाटाण्यास १००० ते १२०० असा दर मिळाला आहे. वाटाण्याच्या दरात रविवारच्या तुलनेत दहा किलो मागे २०० ते ३०० असा वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.
पावट्याची १४ क्विंटल आवक झाली असून दहा किलो पावट्यास ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. वॅाल घेवड्याची १२ क्विंटल आवक, तर दर प्रतिदहा किलो ३०० ते ४००, शेवग्याची आवक पाच क्विंटल, तर दर ३०० ते ५००, ओल्या भुईमूग शेंगेची आवक एक क्विंटल, तर दर ३५० ते ४५० असे राहिले. भेंडीची १३ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो भेंडीस २०० ते २५० असा दर मिळाला आहे. फ्लॅावरची ४२ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो फ्लॅावरला ८० ते १२० असा दर मिळाला आहे.
वांगी, ढोबळी मिरची, कारली, गवारीच्या आवकेत वाढ झाली आहे. वांग्याची १७ क्विंटल आवक झाली. दहा किलो वांग्यास १०० ते २०० असा दर मिळाला. कारल्याची आवक सात क्विंटल, तर दर प्रतिदहा किलो १०० ते १५०, ढोबळी मिरचीची आवक १९ क्विंटल, तर दर २०० ते २५०, गवारीची आवक २६ क्विंटल, तर दर १५० ते २५० असे राहिले. पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. मेथची २००० जुड्यांची आवक झाली असून मेथीस शेकड्यास ६०० ते ८०० दर मिळाला आहे. कोथिंबीरची २५०० जुड्याची आवक झाली असून, कोथिंबिरीस शेकड्यास ३०० ते ६०० असा दर मिळाला आहे.

0 comments:
Post a Comment