Thursday, November 15, 2018

नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापन

नारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी देण्याची गरज असते. पुरेसे पाणी दिल्याशिवाय अपेक्षित वाढ व उत्पादन मिळत नाही. नारळ झाडास ठिबक किंवा आळ्यातून पाटपाणी द्यावे. लहान रोपास प्रतिदिन दहा लिटर पाणी द्यावे. मोठ्या  झाडांना ठिबक सिंचनाद्वारे ऑक्टोबर ते जानेवारीमध्ये प्रतिदिन ३० लिटर पाणी द्यावे. फेब्रुवारी ते मेपर्यंत प्रतिदिन ४० लिटर पाणी द्यावे. खोडापासून १.२५ मीटर अंतरावर गोलाकार लॅटरल पाइप टाकून त्याला सहा ड्रिपर लावावेत.

खत व्यवस्थापन
झाडास १ किलो नत्र, अर्धा किलो स्फुरद आणि एक किलो पालाश खताची मात्रा तीन समान हप्त्यात (जून, ऑक्टोबर आणि फेब्रुवारी) देण्याची शिफारस आहे.

सेंद्रिय खत
नारळबागेत प्रतिहेक्टरी प्रतिवर्ष  ३.५ ते ४ टन काडीकचरा (झाडी, फोका व इतर) उपलब्ध होतो. नारळ बागेतील आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या विविध मसाले पिकांपासून १.६ टन ते  ४.४ टन काडीकचरा उपलब्ध होतो. नारळ बागेतील काडीकचऱ्यापासून दरवर्षी दोन टन आणि मसाले पिकाच्या काडीकचऱ्यापासून ४८० किलो ते १५०० किलो गांडूळखत तयार होऊ शकते. प्रत्येक उत्पादनक्षम झाडास जून महिन्यात ५० किलो गांडूळखत आळे पद्धतीने द्यावे.

सूक्ष्म अन्नद्रव्ये
माती परीक्षणानुसार झाडास १.५ किलो सूक्ष्मद्रव्याची मात्रा तीन समान हप्त्यांत द्यावी. पहिला हप्ता जूनमध्ये, दुसरा हप्ता आॅक्टोबर आणि तिसरा हप्ता जानेवारी महिन्यात द्यावा.

आच्छादन
नारळबागेत आच्छादनाचा वापर केल्यामुळे ओलावा टिकून राहतो. फळांच्या उत्पादनात सातत्य राहते.  नारळाच्या झावळ्यांचे आच्छादन करावे. यासाठी झावळ्या दोन ते तीन भागांत तोडून देठ बाजूला काढावा.या झावळ्या बुंध्यात सर्वत्र गोलाकार पसराव्यात.

वय कंपोस्ट, शेणखत (किलो)  नत्र (ग्रॅम)(प्रति झाड प्रति वर्ष) स्फुरद (ग्रॅम) (प्रति झाड प्रति वर्ष) पालाश (ग्रॅम) (प्रति झाड प्रति वर्ष)
 १०   २०० १००  ४००  
२    २०  ४००   २०० ८००
 ३० ६०० ३००   १२००
४    ४० ८०० ४००   १६००
 ५० १०००   ५००  २०००

डॉ. वैभव शिंदे, ९५१८९४३३६३
(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि. रत्नागिरी)

News Item ID: 
18-news_story-1542279540
Mobile Device Headline: 
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापन
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture story in marathi, water and fertilizer management for coconut crop
Author Type: 
External Author
डॉ. वैभव शिंदे, डॉ. सुनील घवाळे
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment