नाशिक : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक घटली. त्या बरोबरच या कांद्याची परराज्यातील मागणीही कमी झाली. या स्थितीत कांद्याला क्विंटलला ३०० ते ९०० व सरासरी ५०० रुपये दर मिळाले. उन्हाळच्या तुलनेत लाल कांद्याला बाजारातून अधिक मागणी होत आहे. या कांद्याची गत सप्ताहात आवकही जास्त झाली. लाल कांद्याला या वेळी ३०० ते १४०० व सरासरी ११०० रुपये दर मिळाले. कर्नाटक व मध्य प्रदेशमधील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशांतर्गत बाजारात येथील कांद्याची मागणी स्थिर आहे. येत्या महिन्यात कर्नाटकातील लाल कांदा संपण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज आहे.
लासलगाव बाजार समितीत मागील आठवडाभर कांद्याचे दर स्थिर होते. बुधवार (ता.२१) व गुरुवार (ता.२२) हे दोन दिवस सुटीमुळे व्यवहार बंद होते. दरम्यान लासलगाव बाजार समितीचे व्यवहार शुक्रवारी (ता.२३) सुटीनंतर सुरू झाले. या वेळी अचानक आवक १५ हजार क्विंटल झाली. चार दिवसांपूर्वी ही आवक सरासरी ८ हजार क्विंटल होती. गुरुवारी लाल कांद्याच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांनी उतरण झाली. दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.२४) पुन्हा सुटी असल्याने बाजारातील व्यवहार बंद राहिले. सोमवार (ता.२६) पासून कांद्याची आवक व दर पुन्हा पूर्वपदावर स्थिर झाले. चालू सप्ताहात तरी कांद्याची आवक व दर स्थिर राहतील, असे लासलगाव बाजार समितीचे सचिव बी. वाय. होळकर यांनी सांगितले.
टोमॅटो आवक जास्त
गत सप्ताहात टोमॅटोला प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला ४० ते १५० व सरासरी १०० रुपये दर मिळाले. या सप्ताहाच्या सुरवातीचे चार दिवस आवक कमी व मागणी स्थिर होती. या काळात टोमॅटोला ८० ते १६० व सरासरी ११५ रुपये दर होते. गुरुवारी ढगाळ वातावरण वाढले. शुक्रवारी आवकेत पुन्हा वाढ झाली. या काळात टोमॅटोच्या क्रेटला ४० ते १०० व सरासरी ७० रुपये दर निघाले. हा दर खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्याने टोमॅटो उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. येत्या सप्ताहातही टोमॅटोची आवक व दराची सद्याची स्थिती कायम राहील, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविला.

0 comments:
Post a Comment