Tuesday, November 20, 2018

फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या व्यवस्थापनामध्ये बदल करावे लागणार आहेत. बगलफुटी, जास्त प्रमाणात वेलीवर निघालेल्या फुटी कमी करून कॅनॉपी मोकळी करावी. मणी थिनिंगच्या वेळी खराब झालेले मणी कमी करावेत.

द्राक्ष विभागातील फळछाटणी संपली आहे. बऱ्याच ठिकाणी बागायतदार वातावरण व तसेच उपलब्ध पाणी याचा विचार करून फळछाटणी लवकर घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच बाजारात एकाच वेळी द्राक्ष येत असल्याने योग्य दर मिळणार नाही, हे लक्षात घेऊनही फळछाटणीचे नियोजन केले जाते.
गेल्या दोन दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांमध्ये (लोहारा, तेलडोकी, किल्लारी, बार्शी) तसेच राज्यातील इतर द्राक्ष विभागात जोरदार पाऊस झाला आहे. या विभागातून स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष जास्त प्रमाणात विक्रीसाठी जातात. काही बागायतदार बेदाणा निर्मितीवर भर देतात. किल्लारी परिसरातील काही बागायातदार द्राक्ष निर्यातदेखील करतात. या विभागामध्ये विविध अवस्थेतील द्राक्षबाग आहेत. या भागात झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांच्या व्यवस्थापनात काही बदल करावे लागणार आहेत.

पोपटी रंगाची अवस्था असलेली द्राक्षघडांची बाग
या बागेत फळछाटणी होऊन फक्त १७ ते १८ दिवस झाले आहेत. सध्याच्या काळात झालेल्या पावसामुळे वेल वाढीचा जोम जास्त प्रमाणात राहील. जोराचा पाऊस झाला असल्यास घडावर काही प्रमाणात मार बसण्याची शक्‍यता आहे. येत्या चार दिवसांत जर ढगाळी वातावरण टिकून राहिले तर कुजेची समस्या तयार होऊ शकते. या वेळी बगलफुटीचा जोम जास्त राहील. वेलीची पानांची गरज अजून पूर्ण झालेली नाही. हे लक्षात घेऊन खालील उपाययोजना कराव्यात.

  • बगलफुटी व जास्त प्रमाणात वेलीवर निघालेल्या फुटी त्वरित कमी करून कॅनॉपी मोकळी करावी.
  • या वेलीची वाढ नियंत्रणात राहावी याकरिता एकदा ०ः०ः५० या खताची मात्रा जमिनीतून २ ते ३ किलो प्रतिएकरप्रमाणे द्यावी.
  • कूज टाळण्याकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

फुलोरा अवस्थेतील द्राक्षबाग

  • या अवस्थेतील द्राक्षबागेत गळ होण्याची समस्या जास्त प्रमाणात येऊ शकते.
  • नुकत्याच झालेल्या पावसामुळे वेलीमध्ये जिबरेलीन्सचे प्रमाण जास्त होईल आणि सायटोकायनीनची पातळी कमी होईल. अशा परिस्थितीमध्ये वेलीमध्ये आवश्‍यक असलेला संजीवकांचा समतोल बिघडतो.

उपाययोजना

  • या बागेत शेंडा पिंचिंग करावे.
  • बगलफुटी त्वरित काढाव्यात.
  • सायटोकायनीनची पातळी वाढवण्याकरिता शिफारशीत संजीवकाची फवारणी करावी.
  • पालाशची (०ः०ः५०) २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे एकदा फवारणी करावी.

३) मणी सेटिंग झालेली बाग
मणी सेटिंग झालेल्या अवस्थेतील बागेमध्ये गळ व कुजेची समस्या नसेल; परंतु पावसाचा मार जास्त बसल्यास मणी चपटे होण्याची किंवा डागळण्याची समस्या दिसते.

उपाययोजना

  • मणी थिनिंगच्या वेळी खराब झालेले मणी कमी करता येतील.
  • या वेळी शेंडावाढ जरी थांबली असली तरी फक्त टिकली मारून घ्यावी.
  • वेलीचा पुढील वाढीचा जोम नियंत्रणात ठेवण्याकरिता पालाशची थोड्या प्रमाणात उपलब्धता करावी.
  • अशा परिस्थितीमधील बागेत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

संपर्क ः ०२०-२६९५६०६०
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे

News Item ID: 
18-news_story-1542718048
Mobile Device Headline: 
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture story in marathi, grape advisary
Author Type: 
External Author
डॉ. आर. जी. सोमकुंवर
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment