Friday, November 23, 2018

गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी निवडा योग्य वाण

बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ही शिफारस असली, तरी ऊसतोडणीनंतर, तसेच खरीप पिकांच्या काढणीस उशीर होण्याने गहू पिकांची लागवड उशिरा करावी लागते. महाराष्ट्रात असे उशिराचे क्षेत्र जवळपास ३० टक्के एवढे असते. यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने एकंदरीतच गहू लागवड क्षेत्रात घट येण्याची शक्यता आहे.

बागायत गव्हाच्या उशिरा पेरणीची शिफारस ही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र, काही ठिकाणी १५ डिसेंबरनंतरही गव्हाची पेरणी केली जाते. वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने हेक्टरी २.५ क्विंटल किंवा एकरी एक क्विंटल उत्पादन कमी मिळते. गव्हाच्या पिकाचे उत्पादन हे बहुतांशी पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर अवलंबून असते. गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.

जाती
गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी निफाड ३४ (एनआयएडब्लू -३४), एकेएडब्लू-४६२७ किंवा फुले समाधान, एनआयएडब्लू १९९४ या सरबती जातींची निवड करावी.
महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात बागायती वेळेवर (१ ते १५ नोव्हेंबर), तसेच उशिरा (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर) पेरणीसाठी सरबती गव्हाचा फुले समाधान (एनआयएडब्लू १९९४) हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. वेळेवर पेरणीखालील उत्पन्न ४६.१२ क्विंटल प्रतिहेक्टर, तर उशिरा पेरणीखाली उत्पन्न ४४.२३ क्विंटल/हेक्टर मिळते. तांबेरा रोगास तसेच मावा किडीसदेखील प्रतिकारक्षम, टपोरे व आकर्षक दाणे, हजार दाण्याचे वजन ४३ ग्रॅम, प्रथिनांचे प्रमाण १२.५ ते १३.८ टक्के, चपातीची प्रत उत्कृष्ट व प्रचलित वाणांपेक्षा सरस, प्रचलित वाणांपेक्षा ९ ते १० दिवस लवकर येतो.

खते
बागायती उशिरा पेरणीसाठी प्रतिहेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाड्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने १८ से.मी. अंतरावर पेरावे. पेरणी करते वेळी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश (४०:४०:४०) म्हणजेच ८७ किलो युरिया, २५० किलो सिंगल सिंगल सुपर फॉस्फेट व ६७ किलो किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. उर्वरित नत्राचा हप्ता ८७ किलो युरिया खुरपणी झाल्यानंतर तीन आठवड्यांनी प्रतिहेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावा.

बीजप्रक्रिया आणि पेरणी
बियाण्यास पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी, तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅकटर व २५० ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.
पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ से.मी खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी. म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.

आंतरमशागत
बागायत उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यांनी खुरपणी करावी. पीक कांडी अवस्थेत आले, की मजुरांच्या साहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही. पिकांची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते.

पाणी व्यवस्थापन
जमिनीत कायमस्वरूपी ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवा राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने (१५ दिवसांनी) योग्य मात्रेत पाणी द्यावे. तापमान कमी राहण्यासाठी गव्हासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषार सिंचनाने शेवटचे पाणी ८० ते ८५ दिवसादरम्यान द्यावे. बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात.
जर, एकच पाणी देण्याइतके उपलब्ध असेल, तर पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी पाणी द्यावे. दोन पाणी देण्याइतका पाणीसाठा उपलब्ध असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल, तर पहिले पाणी २० ते २२, दुसरे ४२ ते ४५ व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९, ०२४२६-२४३३३८
(महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

News Item ID: 
18-news_story-1542976089
Mobile Device Headline: 
गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी निवडा योग्य वाण
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon,wheat late sowing tips
Author Type: 
External Author
डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. राहुल कडू
Search Functional Tags: 
बागायत, खरीप, गहू, wheat, महाराष्ट्र, Maharashtra, थंडी, निफाड, Niphad, उत्पन्न, खत, Fertiliser, रासायनिक खत, Chemical Fertiliser, सिंगल सुपर फॉस्फेट, Single Super Phosphate, म्युरेट ऑफ पोटॅश, Muriate of Potash, कॅप्टन, तण, weed, नासा, पाणी, Water, ओला, तुषार सिंचन, sprinkler irrigation, सिंचन, महात्मा फुले, कृषी विद्यापीठ, Agriculture University
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment