कोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त प्रमाणात परिणाम होतच असतो. फळपिकांमध्ये तापमान बदलाचा निश्चित परिणाम होतो. हिवाळ्यामध्ये १० अंश सेल्सिअस तापमान कमी झाले तरी त्याचा पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो हे टाळण्यासाठी हिवाळ्यात फळबागांची विशेष काळजी घ्यावी.
१) अति थंड हवामान, थंडीची लाट, धुके, थंड वारे आणि गारा यांमुळे झाडांना इजा होते, अशा प्रतिकूल शीत लहरीमुळे फळझाडांचे नुकसान होते आणि त्यापासून फळझाडांचा बचाव करणे आवश्यक ठरते. अशा प्रतिकूल हवामानात फळझाडांवर अनिष्ट परिणाम होतो.
२) कमी तापमानामुळे झाडांची वाढ मंदावते, जमिनीचे तापमान कमी होते, वनस्पतींच्या पेशी मरतात, फळपिकांमध्ये फळे तडकतात यामध्ये प्रामुख्याने द्राक्षे, केळी, डाळिंब, बोर, अंजीर, पपई इत्यादी फळपिकांना हे प्रमाण जास्त असते. केळी पिकांमध्ये घड बाहेर पास्त नाही. रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
३) शीत हवामानामुळे फुले, फळे, पाने, खोड आणि मुळ्या यांवर प्रतिकूल परिणाम होतो. अतिशील हवामानात पेशींमधील पाणी गोठून पेशीकणातील पाणी नष्ट झाल्यामुळे त्या शक्तीहीन होऊन पेशी मरू लागतात. पाणी गोठण्याच्या तापमानात झाडाची पाने, खोड यांच्या पेशीमधील पाणी गोठण्याची प्रतिकारशक्ती ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात झाडे अशा शीत हवामानाला प्रतिकार करू शकतात.
४) अतिशील तापमानामुळे खोड आणि फांद्या याच्या आतील भाग काळा पडतो आणि ठिसूळ बनतो. रोपवाटिकेतील कोवळी कलमे यास बळी पडतात. कोवळी पाने, फुट आणि फांद्या सुकतात, झाडांना इजा पोचते.
५) तापमान कमी झाल्यास खोडाच्या सालीला इजा होऊन साल फाटते. कधी कधी ही इजा खाली मुळ्यापर्यंत पोचते. अशावेळी सालीचा इजा झालेला भाग खरडून जखमेला बोर्डोपेस्ट लावून बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळते.
६) उष्ण हवामानात वाढणाऱ्या फळझाडांच्या मोहराला शीत लहरीमुळे जास्त नुकसान पोचते. आंब्याचा मोहोर जळतो. सदारहित झाडे ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर आणि जास्त प्रमाणात नाजूक असून ती थंडीच्या दुष्परिणामास बळी पडतात. तापमान २ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पपईची वाढ थांबते. फळांची प्रत बिघडते. जास्त थंडीमुळे झाडे मरतात.
७) तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसच्या खाली गेले तर केळी झाडांची वाढ मंदावते. पाने पिवळी पडतात, केळफूल बाहेर पडत नाही. फळांना चिरा पडतात. द्राक्ष वेलीच्या वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या काळात कडक थंडीचा वाईट परिणाम होतो. द्राक्षाची फळे गळतात, फळांची प्रत खराब होते. द्राक्षाची कोवळी फुट, पाने आणि मणी यांची नासाडी होते.
८) संत्रा, मोसंबीत १० अंश सेल्सिअसच्या खाली तपमानात वाढ थांबते. फलधारणा होत नाही. डाळिंब व लिंबू फळांची साल तडकते.
उपाययोजना ः
१) थंडी, उष्ण तापमान आणि वारा यांच्यापासून संरक्षण करण्याकरिता वाऱ्याच्या बाजूने वारा प्रतिबंध झाडांची(सुरू, बोगनवेल, बांबू, घायपात मलबेरी, शेवगा, शेवरी, खडसरणी, पांगारा, ग्लिरीसिडीया इ.) रांग लावावी.
२) बागेच्या सभोवार मध्यम उंच कुंपण घालून झाडांची लागवड करावी. उदा. शेवरी, मेंदी, चिलार, कोयनेल, एरंडी, घायपात इ. झाडांची सतत निगा व छाटणी करावी.
३) मुख्य फळझाडे लहान असल्यास दोन झाडांतील मोकळ्या जागेत, उघड्या जमिनीवर दाट पसरणारी आंतरपिके घ्यावीत. उदा. हरभरा, वाटणा, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, मुग, मटकी इ.
४) केळी, पपई व पानवेलीच्या भोवती दाट शेवरी लावावी.
५) फळझाडांच्या ओळीत किंवा बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा पेटवून धूर करावा. बागेत रात्रभर धूर राहील याची काळजी करावी.
६) बागेस रात्री पाणी द्यावे, यामुळे जमिनीचे तापमान वाढते. पर्यायाने बागेतील तापमान वाढीस मदत होते.
७) थंडीची लाट येणार हे लक्षात येताच सायंकाळी फळझाडांना विहिरीचे हलके पाणी द्यावे. विहिरीच्या पाण्याचे तापमान कालव्याच्या पाण्यापेक्षा थोडे जास्त असते, अशी ओली जमीन लवकर थंड होत नाही.
८) झाडांच्या खोडापाशी व आळ्यात गवत, कडबा पाचोळा, गव्हाचे तुस इ. आवरण घालावे.
९) केळीच्या बागेस रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. प्रती झाड १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटाश द्यावे. केळीच्या घडाभोवती व खोडाभोवती त्याच झाडांची पाने गुंडाळावीत.
१०) द्राक्ष बागेस सभोवती गोणपाट किंवा इतर कापडांचे पडदे लावावेत. याचा उपयोग बागेत थंड हवेची लाट अडवली जाते.
११) डाळिंबाची फळे तडकू नयेत म्हणून नियमित पाणी द्यावे.
१२) रोपवाटिकेतील रोपे, कलमे, रोपांचे वाफे यावर रात्री आच्छादन घालावे व सकाळी ते काढावे. त्यासाठी काळे प्लॅस्टिक, पोती यांचा उपयोग करावा.
१३) पालाशयुक्त वरखत किंवा राख खत म्हणून दिल्यास झाडांची जल व अन्नद्रव्य शोषणाची आणि वहनाची क्षमता वाढून पेशींचा काटकपणा वाढतो.
संपर्क ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

0 comments:
Post a Comment