ज्या ठिकाणी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे अशा ठिकाणी मुरघास बनविण्याचे नियोजन करावे. मुरघास बनविण्यासाठी एकदल पिकांची निवड करावी, कारण त्यामध्ये कर्बोदके आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांची आंबविण्याची प्रक्रिया चांगली होते. मका हे पीक मुरघास बनविण्यासाठी चांगले आहे.
जनावरांना वर्षभर हिरव्या चाऱ्याची अावश्यकता असते; परंतु संपूर्ण वर्षभर जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होत नाही. हिरवा चारा न मिळाल्यामुळे जनावरांना केवळ भुसा आणि कडबा खाऊ घातला जातो. यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी असते, त्यामुळे दूध उत्पादन तर कमी होते शिवाय जनावराच्या आरोग्यावरही परिणाम होतात. पावसाळ्यात ३ ते ४ महिने हिरवा चारा उपलब्ध असतो. या काळात मुरघास बनवून भविष्यातील हिरव्या चाऱ्याच्या टंचाईवर मात करता येते.
मुरघास तयार करण्याची पद्धत
- ज्वारी, बाजरी व मका ही एकदल पिके व लसूण गवत, बरसीम या द्विदल चारा पिकापासून मुरघास तयार करता येतो.
- मक्याचे पीक पोटरीवर येऊन दाणे दुधाळ असताना तर ज्वारी किंवा बाजरीचे पीक फुलोऱ्यावर असताना कापावे.
- चाऱ्याची कुटी करून घ्यावी. जमिनीखाली आवश्यक त्या आकाराचा २.४ ते ३.० मीटर खोल खड्डा तयार करावा किंवा जमिनीवर १० ते १२ फूट उंच आकाराची टाकी बांधून मुरघास साठविता येतो. खड्डा तयार करताना उंच भागावरील जमिनीची निवड करावी. कारण मुरघासाच्या खड्ड्यापासून पाण्याचा निचरा व्यवस्थित होणे आवश्यक असते.
- चांगल्या प्रतीचा मुरघास तयार करण्याकरिता द्विदल पिकामध्ये प्रत्येक थरानंतर १ ते १.५ टक्के गुळाचे पाणी शिंपडावे. एकदल पिकामध्ये १ टक्का युरियाचे द्रावण शिंपडावे.
- चारा भरताना चाऱ्यामध्ये हवा राहणार नाही यासाठी चारा चांगला दाबून भरावा. चाऱ्यामध्ये हवा राहिल्यास चाऱ्याला बुरशी लागण्याची शक्यता असते.
- खड्डा पूर्ण भरल्यानंतर शेण व चिखलाने लिंपून घ्यावा किंवा प्लॅस्टिक पेपरने झाकावा. वरती गवत किंवा कडब्याच्या पेंढ्या पसराव्यात. अशा प्रकारे बनविलेला मुरघास तयार होण्यास ५५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो.
मुरघास जनावराना खाऊ घालण्याची पद्धत
- खड्ड्याच्या तोंडास छोटे छीद्र पाडून त्यातून रोज आवश्यकतेनुसार मुरघास काढून घ्यावा. मुरघास काढून घेतल्यानंतर त्यावर वाळलेले गवत किंवा पॅस्टिक पेपरने तोंड बंद करावे.
- दुभत्या जनावरांना दररोज १० ते १५ किलो मुरघास खाऊ घालावा. मुरघासाची चव अांबट गोड असते, त्यामुळे जनावरे तो आवडीने खातात.
- मुरघास कोरड्या चाऱ्याबरोबर एकत्र करुन दिल्यास गाई, म्हशी मुरघासच्या वासामुळे तसेच चवीमुळे कोरडा चाराही आवडीने खातात.
संपर्क ः कुलदीप शिंदे, ९८८१४१४९६७
(राजस्थान कृषी विद्यापीठ, बिकानेर, राजस्थान.)

0 comments:
Post a Comment