अांबिया बहर व्यवस्थापन ः
- अांबिया बहराच्या फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्या किंवा सुकलेली साल काढावी. त्यानंतर त्वरित काबेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात अांबिया बहर घेण्याकरिता झाडाला ताबडतोब ताण द्यावा. पाणी देऊ नये. अधिक चांगल्या प्रकारे ताण देण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये क्लोरमेक्वॉट क्लोराईड २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- झाडाखालील तणे काढून बाग स्वच्छ करावी.
- बुंध्याजवळ मातीचे ढीग असल्यास त्यांना तोडून मोकळे करून घ्यावे.
मृग बहर व्यवस्थापन ः
- मृग बहर धरलेल्या संत्रा व मोसंबी झाडांसाठी ठिंबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. या काळात ६ वर्षांच्या झाडाला प्रतिदिन ४१ लिटर, ८ वर्षांच्या झाडाला ६५ लिटर, आणि १० वर्षांच्या झाडाला ८२ लिटर पाणी द्यावे.
- लिंबू झाडांसाठी ६ वर्षे वयाच्या झाडाला प्रतिदिन २३ लिटर, १० वर्षांच्या झाडाला ७५ लिटर पाणी द्यावे.
- मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता, फवारणी
एक ग्रॅम जिबरेलिक आम्ल अधिक मोनोपोटॅशिअम फाॅस्फेट किंवा डायअमोनियम फॉस्फेट किंवा पोटेशिअम नायट्रेट यापैकी एक १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी. - १५-२० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
कीड व्यवस्थापन ः
लिंबूवरील पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी,
फवारणी प्रतिलिटर पाणी
क्विनालफाॅस दीड मिलि किंवा नोव्हॅल्युरॉन १ मिलि. किंवा डायमिथोएट १.५ मिलि.
आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कीटकनाशक बदलून पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
या महिन्यामध्ये मृग बहराच्या फळांवर कोळी कीडीचा प्रादुर्भाव दिसतो. कोळी प्रादुर्भावामुळे हिरव्या फळांवर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. पुढे हळूहळू ते काळ्या रंगाचे होतात. स्थानिक भाषेमध्ये त्याला ‘लाल्या’ संबोधले जाते.
कोळी नियंत्रणाकरिता, फवारणी प्रतिलिटर पाणी
डायकोफाॅल १.५ मिलि. किंवा इथिआॅन २ मिलि. किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम
आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
रोग व्यवस्थापन ः
- झाडाच्या बुंध्यावर २ फुटांपर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशने लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरिता १ किलो मोरचूद व १ किलो चुना प्रत्येकी ५ लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून पेस्ट करावी.
- संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास तीक्ष्ण चाकूने खरडून स्वच्छ करून घ्यावा. त्या ठिकाणी मेटॅलॅक्झील एम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील एएल २०० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे पेस्ट बनवून लावावी.
संपर्क ः ०७१२-२५००३२५
(केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

0 comments:
Post a Comment