Monday, December 10, 2018

गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजना

सध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर महिन्यातील रात्री मोठ्या आणि काळोख्या असतात. यामुळे गुलाबी बोंड अळीच्या पतंगाची अंडी देण्याची क्षमता वाढते. हे वातावरण उपजिविकेसाठी अनुकूल असते. डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये कपाशीतील गुलाबी बोंड अळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करावे.

  • प्रतिएकर ८ ते १० कामगंध सापळ्यांचा वापर करावा. त्यात सापडणारे नर पतंग पकडून नष्ट करावेत.
  • गरजेनुसार वेळोवेळी कामगंध सापळ्यातील ल्युअर बदलून घ्यावेत.
  • कापूस साठवण केलेल्या जागी आणि जिनिंग-प्रेसिंग मिलच्या ठिकाणी प्रकाश सापळे, कामगंध सापळे लावावेत.
  • पुढील वर्षी शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाट्या किंवा कपाशीचे शेतातील अवशेष नष्ट करावेत.
  • त्यासाठी कापसाची शेवटची वेचणी झाल्यानंतर शेतात जनावरे चरण्यासाठी सोडून द्यावीत. उर्वरित शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणास मदत होते.
  • डिसेंबरनंतर कपाशी पिकाचा खोडवा (फरदड) अनेक शेतकरी ठेवतात. फरदड कपाशी पाणी दिल्याने कपाशीला पाते, फुले व बोंडे गुलाबी बोंड अळीच्या उपजीविकेसाठी कपाशी बोंडे उपलब्ध होत राहतात. परिणामी किडीची वाढ होत राहते. ही कीड बी. टी.ला प्रतिकारकता निर्माण करते. म्हणून डिसेंबर ते १५ जानेवारीच्या आत पीक काढून टाकावे. किंवा खोडवा घेणे टाळावे.
  • पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाट्या शेतात किंवा शेताजवळ त्यांचा ढीग करून ठेऊ नये. अशा पऱ्हाट्यांचा रोटाव्हेटरच्या साह्याने चुरा करून त्याचा सेंद्रिय खत म्हणून वापर करता येईल.
  • किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा शेतात गोळा करून जाळून नष्ट करावा.
  • पाण्याची उपलब्धता असल्यास पिकाची फेरपालट करावी.
  • पाण्याची उपलब्धता नसल्यास डिसेंबर महिन्यानंतर शेत ५ ते ६ महिने कापूस पीकविरहित ठेवावे. गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात अडथळे येऊन पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • पीक काढणीनंतर खोल नांगरणी करून जमीन उन्हात चांगली तापू द्यावी.
  • ज्या शेतकऱ्यांची कपाशीची लागवड उशिरा केली होती, त्यांनी गरज भासल्यास सायपरमेथ्रीन (१० टक्के ई.सी.) १ मि.ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

संपर्क -
डॉ. दादासाहेब पोखरकर, ९९२३७३५००२
डॉ. पंकजकुमार पाटील, ७५८८९२११९६

(डॉ. पोखरकर हे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषी कीटकशास्त्र विभागप्रमुख असून, डॉ. आघाव आणि डॉ. पाटील हे क्रॉपसॅप प्रकल्पामध्ये अनुक्रमे समन्वयक व संशोधन सहयोगी म्हणून कार्यरत आहेत.)

News Item ID: 
18-news_story-1544443038
Mobile Device Headline: 
गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजना
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon, controlling of pink ballworm in cotton
Author Type: 
External Author
डॉ. दादासाहेब पोखरकर, डॉ. सखाराम आघाव, डॉ. पंकजकुमार पाटील
Search Functional Tags: 
गुलाब, Rose, बोंड अळी, bollworm, कापूस, खत, Fertiliser, मात, mate, महात्मा फुले, शेती, अॅग्रोवन, कीड-रोग नियंत्रण
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment