Monday, December 17, 2018

योग्य वेळी करा मिरीची काढणी

मिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी रंगाचे झाल्यानंतर त्या वेलावरील सर्व घोस काढावेत. काळीमिरी तयार करण्यासाठी सुधारित पद्धत विकसित झाली आहे. या पद्धतीमुळे दर्जेदार काळी आणि पांढरी मिरी तयार करता येते.

मिरी लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर उत्पादन सुरू होते. मे -जून महिन्यामध्ये तुरे येऊन जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घोस काढण्यासाठी तयार होतात. घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी रंगाचे झाल्यानंतर त्या वेलावरील सर्व घोस काढावेत. काढलेल्या घोसातील मिरीचे दाणे अलग करावेत आणि हे दाणे उकळत्या पाण्याची प्रक्रिया करून उन्हात वाळवावेत. सुमारे सात ते दहा दिवस दाणे उन्हात वाळवावे लागतात. काळीमिरी तयार करण्यासाठी सुधारित पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीत मिरी दाणे वाळवण्यापूर्वी उकळत्या पाण्यात एक मिनीट बुडवावेत. ही पद्धत फायदेशीर आहेत.

  1. मिरीचे दाणे दोन ते तीन दिवसांत वाळतात.
  2. दाण्यांना आकर्षक काळा रंग येतो.
  3. बुरशीमुळे साठवण करताना दाण्यांचे नुकसान होत नाही.
  4. मिरी दाण्याची प्रत सुधारते.
  5. शंभर किलो हिरव्या मिरीपासून सुमारे ३३ किलो काळीमिरी मिळते.
  6. हिरव्या मिरीचा वापर लोणचे निर्मितीसाठी करता येतो.

पांढऱ्या मिरीची निर्मिती ः
मिरीपासूनच पांढरी मिरीदेखील तयार करतात. युरोपियन देशात पांढऱ्या मिरीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेने पांढरी मिरी करण्याची पद्धत तयार केली आहे. या पद्धतीत पूर्ण पक्व झाालेले (लाल/नारंगी रंग) दाणे उकळत्या पाण्यात २५ ते ३० मिनिटे उकळवतात किंवा वाफवतात. नंतर हे उकळलेले दाणे पल्प मशीनमध्ये घालून त्यांची वरची साल काढली जाते. साल काढल्यानंतर दाणे ब्लिचिंग पावडरच्या २ टक्के द्रावणात दोन ते तीन मिनिटे भिजवितात. द्रावण तयार करण्यासाठी दहा लिटर पाण्यात २० ग्रॅम ब्लिचिंग पावडर मिसळावी. यानंतर हे दाणे तीन दिवस सावलीत वाळवतात. या पध्दतीत दाण्यांची साल फुकट जात नाही. सालीपासून तेल काढता येते. पांढऱ्या मिरीचा उतारा सुमारे २५ टक्के इतका असतो.

संपर्क ः डॉ. वैभव शिंदे, ७०३०८१८९५७
(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि. रत्नागिरी )

News Item ID: 
18-news_story-1545046803
Mobile Device Headline: 
योग्य वेळी करा मिरीची काढणी
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon, Black pepper harvesting
Author Type: 
External Author
डॉ. वैभव शिंदे, संतोष वानखेडे
Search Functional Tags: 
नारळ, शेती, मसाला पिके, आले लागवड, हळद लागवड
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment