Tuesday, December 18, 2018

गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सूक्ष्मअन्नद्रव्ये महत्त्वाची...

प्रकाश संश्लेषणामध्ये हरितलवक आणि हरितद्रव्य यांचा विकास करण्यास मंगल  हे अन्नद्रव्य मदत करते. सिलिकॉनमुळे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. स्फुरदाचे शोषण वाढते आणि फळांचा आकारमान सुधारते.  तांबे  हे अ जीवनसत्त्व निर्माण करण्यास मदत करते. वनस्पतीच्या पुनरुत्पादन प्रक्रियेस प्रोत्साहन देते.

मँगनीज
कार्ये

नत्र संचयन आणि वितचकांना चालना मिळते. प्रकाश संश्लेषणामध्ये हरितलवक आणि हरितद्रव्यांचा विकास होतो. लोहाचे वहन करण्यास मदत होते. पेशीमध्ये संयोग पावण्याच्या प्रक्रियेत मॅंगनीज सहायक म्हणून कार्ये करते. संप्रेरकांचा महत्त्वाचा घटक असल्याने वनस्पतींना श्वसनक्रियेत आणि प्रथिने तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत होते.

कमतरता लक्षणे
कमतरतेची लक्षणे मॅग्नेशियमसारखी दिसतात. यामुळे नवीन पानांच्या शिरामधील भाग पिवळा पडतो. पानामध्ये हरितलवक व हरितद्रव्ये कमी होतात. पिवळ्या ठिपक्यांचे नंतर पिवळ्या पट्ट्यात रूपांतर होते किंवा जाळीदार शिरांमध्ये करडे डाग पडतात. शुगरबीटमध्ये पिवळसर छोटेसे डाग, वाटाण्यावर पाण्यासारखे ठिपके व बटाट्यामध्ये भुरकट चट्टे (स्कॅब) दिसतात.

उपाययोजना 
माती परीक्षणानुसार जमिनीतील मॅंगनीजचे प्रमाण २ मिलिग्रॅम प्रतिकिलो (पीपीएम) पेक्षा कमी असल्यास कमतरता समजावी. जमिनीतून १० ते २५ किलो मॅंगनीज सल्फेट प्रतिहेक्टर शेणखतातून द्यावे. फवारणीद्वारे ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) मॅंगनीज सल्फेटची फवारणी करावी.

सिलिकाॅन 
अनेक जमिनीत प्रमाण सिलिकॉनचे प्रमाण भरपूर असले, तरी उपलब्धता कमी असते. परिणामी, पिकांमध्ये त्याच्या प्रतिक्रिया दिसून येतात. सिलिकाॅनमुळे पिकांमध्ये रस शोषणाऱ्या कीडींचे प्रमाण कमी, तसेच बुरशीच्या रोगांचे प्रमाण कमी होते. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. स्फुरदाचे शोषण वाढते आणि फळांचा आकारमान सुधारते. सिलिकाॅन फळाची साल सूर्यप्रकाशाने खराब होण्यापासून वाचविते. जमिनीत असलेल्या जास्त क्षाराच्या ताणापासून पिकास वाचविते.

तांबे 
कार्ये

अॅमिनो अॅसिड आणि प्रथिनांशी संयोग पावून अनेक प्रकारची संयुगे तयार होतात. वनस्पतीमध्ये प्रथिने व कर्बयुक्त पदार्थ तयार करण्याच्या शरीरक्रियेशी संबंधित आहे. अ जीवनसत्त्व निर्माण करण्यास मदत करतो. वनस्पतीच्या पुनरुत्पादन प्रक्रियेस प्रोत्साहन देतो. पेशीमध्ये आॅक्सिडेशन रिडक्शन, प्रकाश संश्लेषण, बाष्पीभवन आणि परागजनन क्षमता, फलन व फळ तयार होणे अशा अनेक महत्त्वाच्या क्रियेत कार्य करतो.

कमतरता लक्षणे
नवीन कोवळ्या पानांच्या शिरामधील हरितद्रव्य कमी होते. पाने जळालेली दिसू लागतात, पानांचा आकार बारीक होऊन ती चुरगळतात, कडा करपतात. लिंबूवर्गीय फळझाडात नवीन वाढ खुंटते. फळांवर तांबूस करडे ठिपके दिसतात. शेंडे मर झालेल्या फांदीवर अनेक फुटवे फुटून शेंड्यावर लहान पानांचा झुपका तयार होतो. साखरेची प्रमाण कमी होऊन आम्लाचे प्रमाण वाढते. कडधान्याच्या मुळांवर रायझोबियमच्या गाठी तयार होण्याची क्रिया मंदावते. शेंगा येणाऱ्या वनस्पतींचा शेंडा पांढरा पडतो. केळीवर बुरशी व विषाणू रोग, नारळात कडांग रोग (यलो माॅटल) आणि मोठ्या झाडावर समर डायबॅक हे रोग येतात.

उपाययोजना
माती परीक्षणानुसार मातीत ०.२ मिलिग्रॅम/किलो (पीपीएम) पेक्षा तांबे कमी असल्यास या सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता समजावी. जमिनीतून १५ ते २५ किलो मोरचूद शेणखतातून मिसळून प्रतिहेक्टरी द्यावे. फवारणीद्वारे ०.४ टक्के मोरचुदाची (४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी अथवा ०.०१ ते ०.२ टक्के बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.

डॉ. अनिल दुरगुडे, ९४२०००७७३१.  : महेश आजबे, ९७६६६६५०८४
(डॉ. दुरगुडे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे रसायनशास्त्र विभागांतर्गत सूक्ष्म अन्नद्रव्ये संशोधन योजनेत विश्लेषक आहेत, तर आजबे व राऊत हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.)

News Item ID: 
18-news_story-1545131484
Mobile Device Headline: 
गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सूक्ष्मअन्नद्रव्ये महत्त्वाची...
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agricultural story in marathi, importance of micronutrients in crop growth
Author Type: 
External Author
डॉ. अनिल दुरगुडे, महेश आजबे, विजय राऊत
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment