सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, ढोबळी मिरची, कोबीच्या दरात किंचित सुधारणा झाली. भाजीपाल्याचे दर मात्र टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची रोज २० ते ३५ क्विंटल, ढोबळी मिरचीची ८ ते १० क्विंटल आणि कोबीची आवक मात्र ३० ते ५० क्विंटलपर्यंत झाली. वांगी आणि ढोबळी मिरची वगळता कोबीची आवक बहुतांश बाहेरील जिल्ह्यातून झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची आवक आणि दर काहीसे उतरले होते; पण या सप्ताहात त्यामध्ये काहीशी सुधारणा झाली.
वांग्याला प्रतिक्विंटलसाठी किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि कमाल २५०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी १४०० रुपये आणि कमाल १७०० रुपये दर मिळाला. कोबीला किमान ३०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक ९०० रुपये असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत या दरामध्ये प्रतिक्विंटलमागे १०० ते २०० रुपयांच्या फरकाने सुधारणा झाली.
त्याशिवाय भाजीपाल्याचे दरही या सप्ताहात पुन्हा टिकून राहिले. कोथिंबिर, मेथी आणि शेपूलाच सर्वाधिक उठाव मिळाला. भाज्यांची आवक प्रत्येकी ६ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत झाली. कोथिंबिरीला प्रतिशंभर पेंढ्यांसाठी ७०० ते ११०० रुपये, मेथीला ५०० ते ७०० रुपये आणि शेपूला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला.
सीताफळाचे दर वाढले
सीताफळाच्या दरात मात्र या सप्ताहात चांगली वाढ झाली. मागणीच्या तुलनेने सीताफळाची आवक फार नव्हती, उस्मानाबाद, लातूर भागातून काही प्रमाणात आवक झाली; पण सर्वाधिक आवक स्थानिक भागातूनच राहिली. सीताफळाची रोज २० ते ३० क्विंटलपर्यंत आवक राहिली. किमान ५०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment