सध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या अविवेकी वापर केला जात असल्याने मित्रकीटकांचे प्रमाण कमी झाले आहे. अशा स्थितीमध्ये परोपजीवी मित्रकीटकांची ओळख आणि संवर्धन काळाची गरज बनली आहे.
कीडनाशकांच्या अतिरेकी व अविवेकी वापरामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढत असून, नियंत्रण करणे अवघड होत आहे. सोबतच शेतातील मित्रकीटकांची संख्याही कमी होत आहे. प्राणीजगतात कीटकांचा वर्ग मोठा असून, त्यात शेतीसाठी नुकसानकारक असलेल्या किडीसोबतच असंख्य उपयुक्त कीटकही आहेत. अशा उपयुक्त कीटकांच्या साह्याने "जीवो जीवस्य जीवनम'' या मूलभूत तत्त्वावर किडींचे जैविक पद्धतीने नियंत्रण करणे शक्य आहे.
परोपजीवी मित्र कीटक
हे मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान असतात. ते किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहतात. किंवा किडींच्या शरीरामध्ये, शरीरावर अंडी घालून तिला हळूहळू खातात.
परजीवी मित्र-किडींचे वर्गीकरण
अंडी -परोपजीवी (Egg Parasitoid)
या परोपजीवी कीटकाची मादी यजमान किडीच्या अंड्यामध्ये अंडी घालते. त्यातून बाहेर आलेली अळी यजमान किडीच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाते. ३ ते ४ दिवसांत अळी कोषावस्थेत जाते. अशा प्रकारे अंडी, अळी व कोष या तिन्ही अवस्था यजमान किडीच्या अंड्यातच पूर्ण होतात. कोषातून बाहेर पडलेला प्रौढ अंड्याला छिद्र पाडून बाहेर पडतो. या प्रक्रियेमध्ये यजमान किडीची अंडी उबण्याआधीच नष्ट होतात.
परोपजीवी मित्र कीटक - यजमान कीड
- ट्रायकोग्रामा चिलोनस - कपाशीवरील बोंड अळ्या, उसावरील कांडी कीड अणि भातावरील पाने गुंडाळणारी अळी इ.
- ट्रायकोग्रामा जपोनिकम आणि टेलिनॉमस रोवाणी - भातावरील खोड कीड
- टेलिनॉमस रीमस - तंबाकूची पाने खाणारी अळी
- ट्रायकोग्रामा बॅक्टरी - कपाशीवरील गुलाबी बोंड अळी
अंडी - अळी- परोपजीवी (Egg-larval Parasitoid)
मादी परोपजीवी यजमान किडीच्या अंड्यांमध्ये अंडी घालते, परंतु त्यांच्या अळ्यांचा विकास होऊन प्रौढ हे यजमान किडीच्या अळी अवस्थेतून त्यांना नष्ट करून बाहेर येतात.
परोपजीवी मित्र कीटक - यजमान कीड
- कोपिडोसोमा कोहेलेरी - बटाट्यावरील पाकोळी
- चेलोनस ब्लॅकबर्नी - ठिपक्याची बोंड अळी
अळी - परजीवी (Larval Parasitoid)
मादी यजमान किडींच्या अळ्यांवर किंवा त्यांच्या शरीराच्या आत अंडी घालते. शरीरातील द्रव परजीवी किडीच्या अळ्या खाऊन टाकतात. त्यामुळे यजमान किडींच्या अळी मृत होते.
परोपजीवी मित्र कीटक - यजमान कीड
- ब्रॅकोन ब्रेव्हीकोर्निस आणि ब्रॅकोन हेबेटर ः कापसावरील बोंड अळी, बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, भात, मका व उसावरील खोड किडा, नारळावरील काळ्या डोक्याची अळी
- कोटेशिया प्लुटेला ः कोबी वरील चौकोनी ठिपक्याचा पतंग
- गोनियोझस नेफॅन्टिडीस ः नारळावरील काळ्या डोक्याची अळी
- प्लॅटिग्यास्टर ओरायजी ः भातावरील गाद माशी
- कॅम्पोलेटिस क्लोरीडा ः कापसावरील बोंड अळी
- एरिबोरस ट्रोचेनन्टेरॅटस ः नारळावरील काळ्या डोक्याची अळी
डॉ. धीरज कदम, ९४२१६२१९१०, विवेक सवडे, ९६७३११३३८३
(लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील सहयोगी प्राध्यापक असून, विवेक सवडे हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.)

0 comments:
Post a Comment