कडबनवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील शेतकरी कमी पाण्यामुळे संरक्षित शेतीकडे वळले आहेत. या गावामध्ये सध्या बारा शेडनेट, पॉलिहाउसची उभारणी झालेली आहे. या गावातील तरुण शेतकरी तानाजी शिंगाडे यांची सोळा एकर शेती असून, त्यामध्ये डाळिंब, टोमॅटो, दोडका, वांगे या पिकांची लागवड असते. संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. कमी क्षेत्र आणि उपलब्ध पाण्यात दर्जेदार उत्पादनासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी दोन एकरावर शेडनेटची उभारणी केली. पहिल्या वर्षी काकडी लागवड केली. त्यामध्ये चांगला नफा झाला. त्यानंतर गेली दोन वर्षे बाजारपेठाचा विचार करून पीक लागवडीचे नियोजन केले जाते. सध्या एक एकर काकडी आणि एक एकर रंगीत ढोबळी मिरचीची लागवड आहे.
लागवडीचे नियोजन
पीक लागवडीच्या नियोजनाबाबत तानाजी शिंगाडे म्हणाले की, मी ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काकडी लागवड करतो. पीकवाढीच्या गरजेनुसार खते आणि पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. एकात्मिक कीड, रोग नियंत्रणावर भर दिला आहे. लागवड केल्यानंतर साधारणपणे ३५ दिवसांनंतर काकडीचे उत्पादन सुरू होते. त्यानंतर पुढे अडीच महिने काकडीचे उत्पादन घेतले जाते. एकरी सरासरी ४० टन काकडीचे उत्पादन मिळते. बाजारपेठेत सरासरी १७ ते १८ रुपये प्रति किलो असा दर मिळतो. काटेकोर नियोजनातून पीक उत्पादन वाढविण्याचा माझा प्रयत्न असतो.
साधारणपणे मार्च महिन्यात रंगीत ढोबळी मिरचीची लागवड करतो. साधारणपणे दोन महिन्यांपासून ढोबळी मिरचीचे उत्पादन सुरू होते. साधारणपणे पाच ते सहा महिने उत्पादन मिळते. बाजारपेठेतील दराचा अंदाज घेऊन तोडणीचे नियोजन असते. एकरी सुमारे ३५ ते ४० टनांपर्यत मिरचीचे उत्पादन मला मिळाले आहे. मला हिरव्या मिरचीस प्रति किलोस १८ ते २० रुपये आणि रंगीत मिरचीला ६० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे.
पीक व्यवस्थापन
शेडनेटमध्ये रोप लागवड करण्यापूर्वी मातीमध्ये शेणखत, कोंबडी खत, निंबोळी पेंड मिसळून गादीवाफे तयार करतो. गादीवाफ्यावर ठिबकच्या लॅटरल अंथरून आच्छादन करतो. त्यानंतर रोपांची लागवड करतो. शिफारशीनुसार टप्प्याटप्प्याने ठिबक सिंचनाच्या माध्यमातून रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करतो.
शेतातील तीन विहिरींना बऱ्यापैकी पाण्याची उपलब्ध असते. शेडनेटमधील काकडी, ढोबळी मिरचीला दररोज ठिबक सिंचनामधून गरजेनुसार ३० मिनिटे पाणी दिले जाते. पाण्याबरोबर विद्राव्य खतांचा शिफारशीत प्रमाणात वापर केला जातो.
पुणे, मुंबई येथील बाजारपेठेत काकडी आणि कोलकता, आसाम, पटना, दिल्ली बाजारपेठेत रंगीत ढोबळी मिरची पाठवितो. काकडी, मिरची बाजारपेठेत पाठविताना पॅकिंगवर लक्ष देतो. काकडीचे प्रतवारी करून २० किलो कॅरी बॅगमध्ये भरली जाते. ढोबळी मिरची तीस किलो बॉक्स पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवतो. मला प्रयोगशील शेतकरी अतुल शिंगाडे यांचे मार्गदर्शन मिळते.
व्हॉट्सॲप ग्रुपवर माहिती
तानाजी शिंगाडे यांनी शेडनेटमध्ये भाजीपाला उत्पादन करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे. या शेतकऱ्यांना शासनाच्या योजना तसेच पीक व्यवस्थापनाबाबत तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव, मंडळ कृषी अधिकारी के. आर. माळवे आणि कृषी सहाय्यक ए. बी. धेंडे हे मार्गदर्शन करतात. गटातील शेतकरी एकमेकांच्या शेडनेटला भेटी देऊन पीक व्यवस्थापनाबाबत चर्चा करतात. त्याचा पीक व्यवस्थापनासाठी फायदा होत आहे.
- तानाजी शिंगाडे, ९८९०४२९०८९

0 comments:
Post a Comment