मिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे असतो. या कॅपासिसीनमुळेच आपल्या जिभेला मिरचीच्या उष्णतेची किंवा तिखटपणाची जाणीव होते. भविष्यामध्ये हा तिखटपणा टोमॅटोमध्ये आणणे शक्य होणार असल्याचे मत ट्रेण्ड्स इन प्लॅंट सायन्स या मासिकामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.
संशोधकांच्या मते, टोमॅटोमध्ये कॅपासिसीन निर्मिती करण्यासाठी सर्व घटक उपलब्ध आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे टोमॅटोमध्ये ही क्षमता आणणे फारसे अवघड नाही.
मिरची आणि टोमॅटो ही दोन्ही पिके एकमेकांच्या जवळची असून, सुमारे १९ दशलक्ष वर्षापूर्वी एकाच पूर्वज वनस्पतीपासून तयार झाली आहेत. त्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणात जनुकीय साम्य आहे. टोमॅटोमध्ये कॅपासिसीन निर्मितीचे सर्व जनुके उपलब्ध आहेत. मात्र, ती कार्यान्वित होण्यासाठीची मूलद्रव्यीय यंत्रणा उपलब्ध नाही. आधुनिक जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे ती नक्कीच विकसित करता येऊ शकते, असे मत ऑगस्टीन झसोगोन यांनी व्यक्त केले. त्यासाठी अत्यंत थोड्या संशोधनाची आवश्यकता आहे. त्या दिशेने आमचे प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
उपयुक्तता ः
- कॅपसिसीनमध्ये जिवाणूंना रोखण्याची क्षमता असून, वैद्यकीयदृष्ट्या त्यांचा वापर वेदनाशामक म्हणूनही केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कॅपसिसीनच्या निर्मितीसाठी टोमॅटोद्वारे त्यांचे उत्पादन उपयुक्त ठरू शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
- मात्र, मिरची किंवा मिरीच्या स्प्रेचा उपयोग संरक्षणासाठीही केला जातो. सामान्य स्थितीमध्ये अशा घटकांच्या तीव्र फवारणीमुळे श्वसन यंत्रणा आणि डोळे यांना इजा पोचू शकते. या कारणांसाठी अनेक देशामध्ये अशा स्प्रे वापराला बंदी आहे.
- तिखटपणा असलेल्या भाज्यांची निर्मिती करणे शक्य होईल.

0 comments:
Post a Comment