Thursday, January 17, 2019

हरभऱ्याला वाढती मागणी

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू व हरभरा वगळता सर्व शेती पिकांचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.
 
सध्या खरीप पिकाची आवक सुरू आहे. गेल्या महिन्यात साखर, गवार बी, हरभरा व कापसाचे भाव उतरत होते. खनिज तेलाच्या किमतीत घट होत होती. त्यामुळे गवार गमच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होईल या भीतीने गवार बीच्या किमती कमी गेल्या महिन्यात कमी होत होत्या. या महिन्यात ही मंदी थांबेल, अशी अपेक्षा आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी आशा आहे. हरभऱ्याची आवक सुरू होत आहे. शासनाने तेलबिया व डाळी हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. सोयाबीन पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊ लागली आहे.

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.
मका
खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २० डिसेंबरनंतर रु. १,७०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्या रु. १,६९७ वर स्थिर आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. १,९३४ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील किमती आता हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बीचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील.

साखर
साखरेच्या (मार्च २०१९) किमती डिसेंबरमध्ये प्रथम घसरत होत्या; त्यानंतर त्या वाढून महिनाअखेर रु. ३०२७ वर आल्या आहेत. सध्या रु. ३,०६९ वर भाव आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,०३० वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (फेब्रुवारी २०१९) किमती डिसेंबर महिन्यात रु. ३,३७२ व रु. ३,४४४ या दरम्यान होत्या. गेल्या सप्ताहात त्या ४.२ टक्क्यांनी वाढून रु. ३,५८७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ३,६९८ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,६८७ वर आल्या आहेत. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). निर्यात मागणी वाढत आहे. त्यामुळे या महिन्यात किमती वाढण्याची शक्यता आहे. १५ जानेवारी रोजी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे व जून डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३,६९८, ३,७४०, ३,७६९, ३,८०९ व ३,८४९ भाव होते.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती डिसेंबर महिन्यात रु. ६,५५६ व रु. ६,९१४ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेने ०.६ टक्क्यांनी वाढून रु. ६,६४२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,९१७ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,७५८). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे; पण आता आवकसुद्धा वाढत आहे.

गहू
गव्हाच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २४ डिसेंबरनंतर रु. २,१६४ च्या आसपास होत्या. या सप्ताहात त्या ४.८ टक्क्यांनी घसरून रु. १,९९२ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,१८७). रब्बी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१९) किमती डिसेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४९९ ते रु. ४,२२६). या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,३१५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती ०.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३७०). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती डिसेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,७०४ ते रु. ४,४६५). हे घसरण याही महिन्यात कायम आहे. या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ४,२४९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१८६ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा मे २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३७५). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). अपुऱ्या पावसामुळे हरभऱ्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. मागणी मात्र वाढती आहे. रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजार भाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१९) किमती डिसेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. २२,७१० ते रु. २१,११०). ही घसरण या महिन्यातसुद्धा कायम आहे. या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी घसरून रु. २१,०१० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,७३१ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २१,५६० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी अजूनही अनिश्चित आहे. यामुळे सध्याची घसरण होत आहे. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किमत प्रति १७० किलोची गाठी).
 
arun.cqr@gmail.com 

News Item ID: 
18-news_story-1547729824
Mobile Device Headline: 
हरभऱ्याला वाढती मागणी
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture story in marathi, forword market for agriculture commodities
Author Type: 
External Author
डॉ. अरुण कुलकर्णी
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment