नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की केंद्रीय अर्थसंकल्पाचे वेध लागतात. अजून दहा दिवसांनी म्हणजे एक फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. परंपरागत हलवा बनविण्याच्या कार्यक्रमानंतर सोमवारी (ता. २१) अर्थसंकल्पासंबंधित कागदपत्रांच्या छपाईला सुरवात झाली.
अर्थमंत्री अरुण जेटली हे उपचारासाठी अमेरिकेत असल्याने यंदा प्रथमच ते हलवा कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. अर्थ राज्य मंत्री शिवप्रताप शुक्ला, अर्थ विभागाचे सचिव सुभाष गर्ग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अर्थसंकल्पाच्या छपाईसाठी मंत्रालयातील १०० अधिकारी व कर्मचारी आता पुढील दहा दिवस अर्थ मंत्रालयातील छपाई कारखान्यात बंदिस्त राहणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा लेखानुदान मांडण्यात येणार आहे.
हलवा बनविण्याची प्रथा
- अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम गोपनीय असते.
- हे किचकट काम हलके-फुलके करण्यासाठी हलवा कार्यक्रम
- १०० अधिकारी व कर्मचारी दहा दिवस बंदिस्त
- बाहेरच्या जगाशी संपर्क नाही.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय अन्य कोणालाही घरी जाण्याची परवानगी नसते.
सुरक्षा व्यवस्था
- अर्थ मंत्रालयात कडेकोट बंदोबस्त
- बाहेरील कोणालाही प्रवेश नाही
- अनिवार्य असेल तरच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत आत प्रवेश
- अर्थसंकल्प फुटू नये यासाठी...
- गुप्तचर विभागासह साईबर सुरक्षा विभागाचा पहारा
- मंत्रालयातील मोबाईल फोनची सेवा खंडित
- केवळ लॅंडलाइन फोनद्वारेच संपर्क
वैद्यकीय सेवा
- मंत्रालयात दहा दिवस डॉक्टरांचे पथक तैनात
- कर्मचारी आजारी पडल्यास तत्काळ सेवा उपलब्ध
- आजारी कर्मचाऱ्याला रुग्णालयात उपचारांवर निर्बंध
इंटरनेट सेवा बंद
- ज्या संगणकांवर अर्थसंकल्पाची कागदपत्रे असतात त्यावरील इंटरनेट सेवा खंडित
- केवळ प्रिंटर व छपाई यंत्रांशीच
- संगणकांची जोडणी
- "एनआयसी'चे सर्व्हरची जोडणीही काढतात
- हॅकिंगची शक्यता राहत नाही
- छपाई कारखान्यात निवडक वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रवेश

0 comments:
Post a Comment