सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागणीच्या तुलनेत आवक कमी राहिल्याने बुधवारी (ता. २७) मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर टिकून राहिले, तर वांग्याची आवक १०० क्विंटलपर्यंत होती. आवक झालेल्या वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ३५० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि कमाल १५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात बुधवारी भाज्यांची आवक खूपच कमी राहिली. गेल्या काही दिवसांत आवकेत घट होत आहे. बुधवारी मेथीची आवक ५ ते ८ हजार पेंढ्या, कोथिंबिरीची ४ ते ९ हजार पेंढ्या आणि शेपूची २ ते ५ हजार पेंढ्यांपर्यंत आवक होती. पण मागणी राहिल्याने दरात काहीशी सुधारणा झाली. ती फारशी समाधानकारक नाही. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून भाज्यांना उठाव नव्हता, पण सध्या आवक कमी असल्याने उठाव आहे. भाज्यांची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली.
मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते ७०० रुपये, शेपूला ५०० ते ७५० रुपये आणि कोथिंबिरीला ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. १०० ते २०० रुपयांच्या फरकाने त्याच्या दरात काहीशी तेजी राहिली. त्याशिवाय पालक, चुक्यामध्येही किंचित चढ-उतार राहिला. त्यांच्या आवकेचीही परिस्थिती अशीच होती. पालकाला शंभर पेंढ्यांसाठी २०० ते ३५० रुपये आणि चुक्याला ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. वांगी, टोमॅटोच्या दरातही फारशी सुधारणा झाली नाही, पण दर स्थिर होते.
टोमॅटोची १५० ते ३०० क्विंटल राहिली. टोमॅटोला किमान २०० रुपये, सरासरी ४५० रुपये आणि कमाल १४०० रुपये असा दर मिळाला. गाजर, काकडीला उठाव बुधवारी गाजर आणि काकडीची आवकही बऱ्यापैकी राहिली. त्यांना मागणीही चांगली होती. गाजराची जवळपास ६० ते १०० क्विंटल आणि काकडीची ५० ते ७० क्विंटलपर्यंत आवक होती, पण या दोन्हींला चांगली मागणी आणि दर मिळाला. गाजराला प्रतिक्विंटल किमान ५०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि कमाल १००० रुपये, तर काकडीला किमान ४०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि कमाल ३५०० रुपये असा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment