Monday, March 11, 2019

औरंगाबादेत द्राक्षाच्या आवकेत चढ-उतार; दर स्थिर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक होत असलेल्या द्राक्षाच्या दरात गत पंधरवड्यापासून एकवेळचा अपवाद वगळता दर स्थिर असल्याचे चित्र आहे. सोमवारी (ता. ११) औरंगाबाद बाजार समितीमध्ये द्राक्षाची १४५ क्‍विंटल आवक झाली. या द्राक्षांना २००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २ फेब्रुवारीला ४० क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ फेब्रुवारीला ३ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर ६ फेब्रुवारीला आवक ५७ क्‍विंटलवर पोचली. शिवाय या ५७ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाचे दर ३००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

१६ फेब्रुवारीला १३० क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला ३५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २० फेब्रुवारीला द्राक्षाची आवक ९३ क्‍विंटल, तर दर २५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ मार्चला १३९ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाचे दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

५ मार्चला द्राक्षाची आवक १६९ क्‍विंटल तर दर २५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७ मार्चला १९० क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला २५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर ९ मार्चला १९० क्‍विंटलच आवक झालेल्या द्राक्षाचे दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

News Item ID: 
18-news_story-1552310367
Mobile Device Headline: 
औरंगाबादेत द्राक्षाच्या आवकेत चढ-उतार; दर स्थिर
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक होत असलेल्या द्राक्षाच्या दरात गत पंधरवड्यापासून एकवेळचा अपवाद वगळता दर स्थिर असल्याचे चित्र आहे. सोमवारी (ता. ११) औरंगाबाद बाजार समितीमध्ये द्राक्षाची १४५ क्‍विंटल आवक झाली. या द्राक्षांना २००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २ फेब्रुवारीला ४० क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ फेब्रुवारीला ३ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर ६ फेब्रुवारीला आवक ५७ क्‍विंटलवर पोचली. शिवाय या ५७ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाचे दर ३००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

१६ फेब्रुवारीला १३० क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला ३५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २० फेब्रुवारीला द्राक्षाची आवक ९३ क्‍विंटल, तर दर २५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ मार्चला १३९ क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाचे दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

५ मार्चला द्राक्षाची आवक १६९ क्‍विंटल तर दर २५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७ मार्चला १९० क्‍विंटल आवक झालेल्या द्राक्षाला २५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. तर ९ मार्चला १९० क्‍विंटलच आवक झालेल्या द्राक्षाचे दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

English Headline: 
agriculture news in Marathi, Grapes rate stable in Aurangabad
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
औरंगाबाद, Aurangabad, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, द्राक्ष
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment