जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची आवक रोडावली आहे. दर मागील महिनाभरापासून टिकून असून, शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल किमान २५०० व कमाल ३५०० रुपये दर मागील आठवड्यात मिळाला. आवक प्रतिदिन ११ क्विंटलपर्यंत राहिली आहे.
सध्या लग्नसराई व इतर कार्यक्रमांमुळे हिरव्या मिरचीला उठाव आहे. मिरचीचे नंदुरबार, दोंडाईचा (धुळे) व जामनेर (जि. धुळे) भागांतील क्षेत्र दुष्काळी स्थितीमुळे संपल्यात जमा आहे. यामुळे मिरचीची मागणी असताना पुरवठा विस्कळित असल्याने काही अडतदारांना थेट आंध्र प्रदेश, जालना भागांतील शेतकऱ्यांकडून पुरवठा करून घ्यावा लागत आहे. एका अडतदाराकडे रोज तीन ते चार क्विंटल मिरची आंध्र प्रदेशातून येत आहे. लहान, तिखट मिरचीला ४००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळाले.
नंदुरबारच्या बाजारात मागील महिन्यापर्यंत ओल्या लाल मिरचीची विक्रमी आवक झाली. गुजरातमधील निझर तालुक्यातील (जि. तापी) सावळदा, पिंपळोद, अंतुर्ली, आदी तापी काठानजीकच्या १२ -१३ गावांमधून हिरव्या व ओल्या लाल मिरचीची आवक नंदुरबारच्या बाजारात होत आहे. तेथेही किमान २५ व कमाल ३५ रुपये दर आहे.
शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यातील औरंगपूर व लगतच्या भागात पाच-सहा शेतकऱ्यांच्या हिरव्या मिरचीची थेट शेतातून व्यापारी खरेदी करून घेत असून, लहान, तिखट मिरचीला जागेवरच ३५ रुपये प्रतिकिलोचा दर तेथे मागील आठवड्यात मिळाल्याची माहिती मिळाली. ओल्या लाल मिरचीला नंदुरबारच्या बाजारात किमान २१०० व कमाल २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर आहे.

0 comments:
Post a Comment