सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजर, काकडीला सर्वाधिक मागणी राहिली. पण त्या तुलनेत त्यांच्या आवकेत घट झाली. पण संपूर्ण सप्ताहभर त्यांचे दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजराची आवक रोज ४ ते ५ क्विंटल आणि काकडीची आवक १० ते २० क्विंटल अशी राहिली. रोज त्याच्या आवकेत फार वाढ झाली नाही. पण त्यात सातत्य होते. पण त्यांना मागणी चांगली राहिली. गाजर, काकडीची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. गाजराला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि कमाल ११०० रुपये तर काकडीला किमान ५०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि कमाल ३००० रुपये असा दर मिळाला.
किरकोळ चढ-उतार वगळता दर टिकून राहिले. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे गाजर, काकडीला मागणी वाढल्याचे दिसते. पण मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने दर काहीसे तेजीत असल्याचे दिसून आले. विशेषतः काकडीला सर्वाधिक मागणी राहिली. गवार आणि भेंडीच्या दरातील तेजी या सप्ताहातही पुन्हा कायम राहिली. त्यांच्या आवकेची परिस्थितीही अशीच होती. रोज ४ ते ६ क्विंटलपर्यंत आवक होती.
गवारला प्रतिक्विंटलला किमान ३५०० रुपये, सरासरी ५००० रुपये आणि कमाल ६५०० रुपये तर भेंडीला किमान २००० रुपये, सरासरी ३२०० रुपये आणि कमाल ५००० रुपये असा दर मिळाला. कांद्याची आवकही वरचेवर वाढत राहिली. पण दरात सुधारणा नाही. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि कमाल ८०० रुपये असा दर मिळाला.
मेथी, शेपूमध्ये सुधारणा
भाजीपाल्याचा बाजारही गेल्या काही दिवसांपासून थंड होता. पण या सप्ताहात मात्र त्यात काहीशी सुधारणा झाली. मेथीला त्यात चांगला उठाव मिळाला. भाज्यांची आवकही कमीच होती. १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत रोजची आवक राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ३५० ते ६०० रुपये, शेपूला ४०० ते ५०० रुपये आणि कोथिंबिरीला २०० ते ४०० रुपये असा दर मिळाला.

0 comments:
Post a Comment