औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.९) काकडीची ३३ क्विंटल आवक झाली. तिला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची २८७ क्विंटल आवक झाली. तिला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ६८७ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर १०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. टोमॅटोची आवक २२ क्विंटल, तर दर ५०० ते १५०० रुपये, वांग्याची आवक ३४ क्विंटल, तर दर १००० ते १६०० रुपये, भेंडीची आवक ३१ क्विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ७ क्विंटल आवक झालेल्या मक्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ८ क्विंटल आवक झालेल्या लिंबूला ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विटलचा दर मिळाला. ४ क्विंटल आवक झालेल्या कारल्याचे दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
सहा क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पत्ताकोबीची आवक १५४ क्विंटल, तर दर १००० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ५४ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २६ क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचा दर १५०० ते ३००० रुपये दर राहिला. २३ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. १३३ क्विंटल आवक झालेल्या गाजराचे दर १००० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. वाटाण्याची आवक १०५ क्विंटल, तर दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ३० क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला १००० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २५ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ५०० ते ४५०० रुपये होते. १९० क्विंटल आवक झालेल्या द्राक्षाचे दर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
४५ क्विंटल आवक झालेल्या पपईला ३०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. टरबुजाची आवक २३०० क्विंटल, तर दर १००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ९ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ३०० ते ५०० रुपये, ७ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकाला २०० ते ३०० रुपये, २५ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला १५० ते २०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. औरंगाबादच्या बाजारात शनिवारी पहिल्यांदाच लालबाग आंब्याची आवक झाली. या आंब्याला ६ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

0 comments:
Post a Comment