रोटरी टोकण यंत्र
- हे उभ्याने ढकला पद्धतीने चालणारे टोकण यंत्र आहे.
- यंत्राच्या सहाय्याने मका, सोयाबीन आणि तूर यांसारखे मध्यम आकाराचे बी पेरता येते. यंत्राच्या सहाय्याने एका ओळीतील दोन बियांतील अंतरही ठरविता राखता येते.
- एक महिला एका तासात ०.०५ हेक्टर जागेत टोकण करु शकते. यंत्राचे वजन २२ किलो आहे.
कोळपणी यंत्र
- जमिनीवर बसून खुरपणी केल्यामुळे गुडघे दुखतात. सुधारित हात कोळपी वापरून हे काम उभ्याने करता येते.
- यंत्राचा उपयोग केल्यास मजुरांची संख्या कमी करुन अधिक चांगले काम होऊ शकते.
त्रिफाळी
- हाताने आंतरमशागत करण्यासाठी त्रिफाळी वापरण्यात येते.
- यंत्र वजनाने हलके असून त्याला तीन फाळ बसविलेले आहेत. त्याच फाळांना तीन रुंद पास आहेत.
- हॅंन्डलने त्रिफाळी ओढली असता जमिनीत पास घुसून ती भुसभुशीत होते. जमिनीतील खोलवरचे तण उपटले जाते.
चाकाचे त्रिफाळी कोळपे / सायकल कोळपे
- यंत्रामध्ये लोखंडी सांगाड्याला एक चाक व त्याच्या पाठीमागे पास बसविलेले असतात. ते वर-खाली करता येतात.
- तण काढण्यासाठी तीन व्ही आकाराचे पास आणि ढकलण्यासाठी चाक आहे.
- यंत्राच्या सहाय्याने एक महिला ०.०४ हेक्टर प्रतितास कोळपणी करू शकते.
मकृवि विळा-खुरपे
- याचे वैशिष्ट्ये म्हणजे हे पारंपरिक विळा व खुरपी यांच्या सारखे असल्यामुळे मजुरांना काम करताना त्रास होत नाही.
- कापणी करण्यासाठी आतून धार लावलेले पाते असून त्याची रुंदी १५० मि.मी. आहे तर बाहेरील बाजूस असलेली धार ही ६३ मि.मी. आहे. ती खुरपणीसाठी वापरही जाते.
- विळा खुरपीचे वजन हे इतर विळ्यापेक्षा कमी असून ते स्प्रींग स्टीलपासून बनविले असल्यामुळे नेहमी धार लावावी लागत नाही.
- एक महिला मजूर साधारणत: एका दिवसात ०.१७० हेक्टर एवढे कापणीचे काम करू शकते.
कापूस सड उपटणी चिमटा
- कापसाचे सड उपटण्यासाठी व्यक्तीला खाली वाकून जोर लावून ते उपटावे लागतात. त्यामुळे हात, पाठ व कंबरदुखीचा त्रास होतो. त्यासाठी चिमट्याचा वापर करणे फायद्याचे आहे.
- यात एक चिमटा असतो, त्यामध्ये सड पकडून लिव्हरच्या सहाय्याने ते पकडावे लागते. यांचे हॅंडल उंच असल्याने खाली न वाकताच सहजपणे सड उपटले जाते.
- चिमट्याचे वजन ५.२५ किलो आहे. एक महिला एका तासामध्ये ५० वर्ग मिटर एवढ्या क्षेत्रावरील सड काढू शकते.
मका सोलणी यंत्र
- कणसापासून दाणे वेगळे करण्यासाठी पारंपरिक पद्धतीत ती काठीने बडविली जातात. त्यामुळे हाताला इजा होते, बियांची अंकुरण क्षमता कमी होते. हे टाळण्यासाठी मका सोलणी यंत्र वापरले जाते.
- हे यंत्र म्हणजे ६.४ सेंमी लांब व ७.२ सें.मी. व्यासाचा एक पाईप तुकडा असून त्याला आतल्या बाजूने दातेरी पट्ट्या बसविलेल्या असतात.
- एका हातात यंत्र पकडून दुसऱ्या हाताने कणीस घालून पुढे-मागे फिरविल्यास प्रति तास २२-२५ किलो दाणे मिळतात. हेच यंत्र अष्टकोनी आकारात मिळते.
- हॅंन्डलच्या सहाय्याने चालणारे रोटरी मका सोलणी यंत्र उपलब्ध आहे. रोटरी डीक्सवरील दात्यामुळे फिरतेवेळेस कणसापासून दाणे वेगळे करते. यात मक्याची कणसे हॉपरमध्ये टाकावी लागतात. यामध्ये बसून व उभे राहून काम करता येते. यंत्राच्या सहाय्याने एका तासात ३० ते ८० किलो दाणे प्रती तास वेगळे होतात.
पदचलित मका सोलणी यंत्र
- मका सोलणीसाठी हाताने सोलणी यंत्र किंवा पारंपरिक पद्धतीने करतात. या पद्धतीमध्ये होणारा श्रम व वेळ वाचवण्याच्या उद्देशाने पदचलित मका सोलणी यंत्र विकसित करण्यात आले आहे.
- यंत्राचा सोलणीचा दर ८०-८५ किलो प्रतितास इतका असून त्याची सरासरी सोलणी क्षमता ९७.७४ टक्के इतकी आहे.
धसकटे गोळा करण्याचे यंत्र
- पीक काढणीनंतर व वखरणीनंतर धसकटे व काड्या गोळा करणे हे वेळखाऊ व श्रमिक काम असते.
- साधारणत: एका हेक्टरवरील धसकटे गोळा करण्यासाठी १२ ते १५ महिला मजूर लागतात. त्याएवजी धसकटे गोळा करण्याचे यंत्र वापरणे सोयीचे होते. हे यंत्र वजनाने हलके असल्याने एका महिलेस वापरण्यास सोपे आहे.
- हे यंत्र म्हणजे दीड ते सव्वादोन फूट लोखंडी अॅंगलला दर अर्धा इंच अंतरावर ३ इंच असलेली लोखंडी सळी लावलेली आहे. सळईचे जमिनीतले टोक अणकूचीदार असते. याला ५ फूट लांबीचे बांबू किंवा हलक्या पाईपचे हॅंडल बसविलेले असते. त्यामुळे न वाकता काम सोपे होते.
- दोन महिला मजूर एका दिवसात एका हेक्टरवरील धसकटे गोळा करू शकतात.
ः एस. एन. सोलंकी, ८००७७५२५२६
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
News Item ID:
18-news_story-1553426306
Mobile Device Headline:
महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे
Mobile Body:

English Headline:
agricultural stories in Marathi, agrowon, technowon, implements for women agriculture work
Twitter Publish:

0 comments:
Post a Comment