Friday, March 15, 2019

राज्यात टॉमेटो २०० ते २७५० रुपये प्रतिक्विंटल

अकोल्यात प्रतिक्विंटल  २००० ते २७५० रुपये
अकोला  - स्थानिक जनता भाजी बाजारात टोमॅटोचे दर प्रतिक्रेट ४०० ते ५५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. २० किलो वजनाच्या एका क्रेटचे हे दर आहेत. येथील बाजारात टोमॅटोची दररोज ७०० ते ८०० क्रेट आवक होत आहे. बाजारात येणारा माल दररोज विक्री होत असल्याने व आवक कमी असल्यामुळे हे दर कडाडल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले. 

या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे टोमॅटोची लागवड कमी आहे. दरवर्षी या काळात मोठी आवक व्हायची. यंदा आवक कमी असल्याने दर वाढलेले आहेत.येथील बाजारात मागील आठ ते दहा दिवसांपासून टोमॅटोच्या दरात जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचा दर ४० ते ५० रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक आहे. बाजारात अकोला जिल्ह्यासह खानदेशातून टोमॅटोची थोडीफार आवक होत आहे. उच्चतम प्रतिचा टोमॅटो प्रतिक्रेट ५५० रुपयांपर्यंत गुरुवारी (ता. १४) विकल्या गेला. बाजारात सरासरी ४०० रुपयांपासून ५५० रुपयांपर्यंत टोमॅटोला दर मिळाले. येत्या काळात आवक वाढली तर दरांवर परिणामाची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

साताऱ्यात प्रतिक्विंटल  १००० ते १७०० रुपये
सातारा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १४) टोमॅटोची ६५ क्विंटल आवक झाली. टोमॅटोस प्रतिक्विंटलला १००० ते १७०० असा दर मिळाला आहे. टोमॅटोचे दर ८०० ते २०० या दरम्यान स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

कोरेगाव, खटाव, सातारा, फलटण तालुक्यांतून टोमॅटोची आवक होत आहे. रविवारी (ता. १०) मार्चला टोमॅटोची १२५ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ८०० ते १५०० असा दर मिळाला होता. 

पाच मार्च १६ क्विंटल आवक होऊन क्विंटलला १००० ते २००० असा दर मिळाला होता. २८ फेब्रुवारीस ८८ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ६०० ते १३०० असा दर मिळाला होता. टोमॅटोची २० ते २५ रुपयेप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे.

सोलापुरात प्रतिक्विंटल २०० ते १५०० रुपये 
सोलापूर  - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोची आवक वाढली, पण दरामध्ये फारशी सुधारणा झाली नाही. टोमॅटोचे दर स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या सप्ताहात टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि कमाल १५०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात हीच आवक प्रतिदिन ८० ते १२५ क्विंटल राहिली. तर टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान १५० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि कमाल १६०० रुपये दर मिळाला.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात टोमॅटोची आवक रोज १०० ते १५० क्विंटलपर्यंत आवक राहिली. टोमॅटोची आवक स्थानिक भागातूनच झाली; पण बाहेरील आवकही सुरू होती. विशेषत- पुणे, सांगली, उस्मानाबाद भागांतून ही आवक होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यातही थोड्याफार फरकाने तशीच स्थिती राहिली. या सप्ताहात आवकेत मात्र काहीशी घट झाली. या सप्ताहात प्रतिदिन ५० ते १०० क्विंटलपर्यंत आवक होती आणि दर टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ६५० रुपये आणि कमाल १५०० रुपये असा दर मिळाला.

नगरला प्रतिक्विंटल ५०० ते २५०० रुपये
नगर - नगर कृषी बाजार समितीत गुरुवारी (ता. १४) १४२ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. टोमॅटोला ५०० ते २५०० रुपये व सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नगर बाजार समितीत टोमॅटोची आवक सुरूच असून दर स्थिर आहेत. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत १६० क्विंटलपर्यंत दर दिवसाला आवक होत असते. ७ मार्चला ११८ क्विंटलची आवक झालेली असून ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. २६ फेब्रुवारीला ७२.५५ क्विंटलची आवक झाली असून ३०० ते २००० व सरासरी १०७५ रुपयांचा दर मिळाला, तर २१ मार्चला ५४ क्विंटलची आवक होऊन ३०० ते १८०० रुपये व सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला. १४ फेब्रुवारीला १२८ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १८०० व सरासरी ११५०रुपये आणि ७ फेब्रुवारीला १५२ क्विंटलची आवक होऊन  ५०० ते १६०० व सरासरी १०५० रुपयांचा दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली.

News Item ID: 
558-news_story-1552645020
Mobile Device Headline: 
राज्यात टॉमेटो २०० ते २७५० रुपये प्रतिक्विंटल
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Tomato in the State is 200 to 2750 rupees per quintal
Author Type: 
External Author
प्रतिनिधी
Search Functional Tags: 
अकोला, Akola, टोमॅटो, खानदेश, बाजार समिती, agriculture Market Committee, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, Usmanabad
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment