Monday, March 18, 2019

जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिर

जळगाव - जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या चोपडा, जळगाव व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक रखडत सुरू आहे. सध्या मळणीचा हंगाम सुरू आहे. आगाप पेरणीच्या क्षेत्रात मळणी आटोपली असून, काही शेतकऱ्यांनी सुरवातीच्या दरांचा लाभ घेण्यासाठी बाजारात गव्हाची पाठवणूक केली आहे. चोपडासह जळगावच्या बाजारात लोकवन गव्हाला प्रतिक्विंटल १७०० व कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. 

पाण्याच्या समस्येमुळे फक्त तापी, गिरणा नदीकाठी पेरणी झाली होती. पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत कमीच झाली. परिणामी उत्पादन कमी असणार आहे. गव्हाच्या हंगामात गारपीट किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती न आल्याने पीक व्यवस्थित हाती आले आहे. दर्जाही चांगला आहे. सध्या दर स्थिर आहेत. परंतु जळगाव येथील बाजारात पुढील १०-१२ दिवसानंतर मध्य प्रदेशातून गव्हाची आवक सुरू होईल. 

स्थानिक क्षेत्रातील आवक रखडत असली तरी बाहेरून आवक वाढणार असल्याने दरात अधिक सुधारणा अपेक्षित नसल्याचे सांगितले जात आहे. जळगाव बाजार समितीत प्रतिदिन १५० क्विंटल आवक मागील दोन-तीन दिवसांत झाली. चोपडा येथेदेखील प्रतिदिन २०० क्विंटलपर्यंत आवक झाली. पुढे आवक वाढू शकते. कारण, येत्या सात-आठ दिवसांत कमाल क्षेत्रावरील गव्हाची मळणी पूर्ण होईल. 

लोकवन प्रकारच्या गव्हाची पेरणी जिल्ह्यात अधिक झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासाठी चंदोसी, वनफोरसेवन प्रकारच्या गव्हाची पेरणीदेखील केली आहे. चंदोसी गव्हास तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर आहेत. त्याची कुठलीही आवक सध्या बाजारात सुरू नाही. स्थानिक व्यापारी, किरकोळ विक्रेते पंजाब व उत्तर प्रदेशातून या गव्हाचा पुरवठा करून घेतात.

News Item ID: 
558-news_story-1552972782
Mobile Device Headline: 
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Wheat prices are stable in Jalgaon
Author Type: 
External Author
चंद्रकांत जाधव
Search Functional Tags: 
गहू, wheat, जळगाव, Jangaon, आग, मात, mate, गारपीट, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, बाजार समिती, agriculture Market Committee, व्यापार, पंजाब, उत्तर प्रदेश
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Wheat, Jalgaon, agrowon
Meta Description: 
Wheat prices are stable in Jalgaon

0 comments:

Post a Comment