Friday, March 22, 2019

सोलापुरात गाजर, काकडीला उठाव

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी (ता. २२) गाजर आणि काकडीला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी गाजराची १० ते १५ क्विंटल आणि काकडीची ३० ते ४० क्विंटलपर्यंत आवक राहिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरातील तेजी टिकून आहे. गाजर, काकडीची आवक आवक स्थानिक भागातून राहिली. पण उस्मानाबाद, सांगली भागातूनही काही प्रमाणात ती राहिली. पण सध्या उन्हाळ्यामुळे गाजर, काकडीला चांगला उठाव मिळत असल्याने दरही तेजीत आहेत. गाजराला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी ७५० रुपये आणि कमाल १७०० रुपये तर काकडीला किमान ३५० रुपये, सरासरी १००० रुपये आणि कमाल २५०० रुपये असा दर मिळाला. 

त्याशिवाय कोथिंबीर, मेथी, पालक, चुका आणि शेपू या भाज्यांनाही शुक्रवारी बऱ्यापैकी उठाव मिळाला. भाज्यांची आवक मात्र खूपच कमी झाली. तीही स्थानिक भागातूनच होती. प्रत्येकी १ ते ४ हजार पेंढ्यापर्यंतच आवक होती. पण मागणी असल्याने त्यांचे दरही तेजीत राहिले. भाज्यामध्ये मेथी, शेपू आणि कोथिंबिरीला सर्वाधिक मागणी राहिली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ३५० ते ५५० रुपये, शेपूला ५०० ते ८०० रुपये, कोथिंबिरीला ५०० ते ७०० रुपये आणि पालक, चुक्‍याला प्रत्येकी ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला.

कांद्याचे दरही टिकून
कांद्याच्या आवकेत मात्र काहीशी घट झाली. एरव्ही २०० गाड्यांपर्यंत असलेली आवक शुक्रवारी ५० ते १०० गाड्यांपर्यंत खाली आली. कांद्याची आवक स्थानिक भागापेक्षा तुलनेने बाहेरील जिल्ह्यातून जास्त राहिली. पण आवक कमी असूनही कांद्याचे दर मात्र जैसे थेच राहिले. त्याच्यात अद्यापही सुधारणा नाही. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १५० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि कमाल ८०० रुपये असा दर मिळाला. 
 
News Item ID: 
18-news_story-1553261300
Mobile Device Headline: 
सोलापुरात गाजर, काकडीला उठाव
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi, Carrot, cucumber lift in Solapur
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
सोलापूर, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, सांगली, Sangli
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment