Monday, March 4, 2019

कळमणा बाजारात हरभरा, सोयाबीनचे दर कमी

नागपूर ः कळमणा बाजार समितीत शेतमालाच्या भावात मोठे चढउतार या आठवड्यात नोंदविण्यात आले. हरभरा व सोयाबीनच्या दरातही गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाल्याची माहिती देण्यात आली.

बाजार समितीत हरभरा दर गेल्या आठवड्यात ३३०० ते ३८७० रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात हरभरा दर ३४५० ते ३७२० रुपयांवर आले. हरभऱ्याची आवक सरासरी ४ हजार क्‍विंटलची आहे. बाजारात सोयाबीनची देखील नियमित आवक असून दरात मात्र चढउतार होत असल्याचे सांगण्यात आले. सोयाबीनची आवक १ हजार क्‍विंटलची आहे. ३३५० ते ३६५८ रुपये क्‍विंटलचा दर सोयाबीनला गेल्या आठवड्यात होता. या आठवड्यात हे दर ३२०० ते ३५४० रुपये क्‍विंटलवर पोचले. तुरीची सरासरी आवक १५०० क्‍विंटलची आहे. तुरीचे दर ४३०० ते ५०१० रुपये क्‍विंटल होते. 

या आठवड्यात हे दर ४३०० ते ४९७५ रुपयांवर पोचले आहेत. बाजारात ज्वारीची जेमतेम तीन क्‍विंटलची आवक आहे. २२०० ते २५०० रुपये   क्‍विंटल दराने ज्वारीचे व्यवहार झाले. सरबती गव्हाची रोजची आवक १५० क्‍विंटलची असून १९०० ते    २००० रुपये क्‍विंटलवर दर स्थिर आहेत. लुचई  तांदळाचे व्यवहार २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलने होत होते. या आठवड्यात हे  दर २२०० ते २३५० रुपये असे झाले. बाजारात टोमॅटोची आवक १०० क्‍विंटलच्या घरात आहे. १००० ते १५०० रुपये क्‍विंटलप्रमाणे टोमॅटोचे व्यवहार होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

बाजारात वाटाणा शेंगाची आवक १८० क्‍विंटलची असून दर १००० ते १५०० रुपये असे आहेत. ढोबळी मिरचीचे दर १४०० ते १८०० रुपये क्‍विंटल असे असून आवक २४२ क्‍विंटलची आहे. काकडीचे दर २००० ते २५०० रुपये तर आवक १४२ क्‍विंटल. गाजर १५३ क्‍विंटल आवक आणि दर ८०० ते १००० रुपये असे आहेत. कच्चे आंब्याचे दर ४००० ते ४५०० रुपये आणि आवक ३२ क्‍विंटल. पालक दर ३०० ते ५०० रुपये क्‍विंटल आणि आवक १६४ क्‍विंटलची आहे.
 
News Item ID: 
18-news_story-1551708279
Mobile Device Headline: 
कळमणा बाजारात हरभरा, सोयाबीनचे दर कमी
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi, In the grocery market, grams of soybeans are low
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, बाजार समिती, agriculture Market Committee, Jowar, टोमॅटो, व्यापार, ढोबळी मिरची, capsicum, मिरची
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment