Tuesday, March 19, 2019

फळे, भाज्यांचा वापर करून दुग्धजन्य पदार्थांचे मूल्यवर्धन

विभागनिहाय उपलब्ध असणाऱ्या फळांना व भाज्यांना जेव्हा कमी भाव असतो व ज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते अशा फळे, भाज्यांचा वापर दुग्धजन्य पदार्थांच्या मूल्यवर्धनासाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो.
 
भारतात एकूण दूध उत्पादनातील साधारणतः ३८ टक्के दूध दुग्धप्रक्रियेसाठी वापरले जाते. ग्रामीण भागात दुधाला शहरी भागाच्या तुलनेत हवा तितका दर मिळत नाही. दुधाची प्रक्रिया करताना कोणते पदार्थ तयार करावेत, विक्री कशी करणार, यंत्रसामग्रीवर बराच खर्च करावा लागतो, या सर्वसाधारण गोष्टीचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे.
दुग्धजन्य पदार्थांत मूल्यवर्धन करण्यास मोठा वाव आहे. फळे, भाजीपाला, साखर व इतर पदार्थांचा वापर करून दुग्धजन्य पदार्थांचे मूल्यवर्धन करता येते. सध्या मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थांची मागणी अनेक कारणांनी वाढत आहे. मॉल, उच्च मध्यम वर्ग, शहरीकरणाचा वाढता प्रभाव, उत्पन्नातील वाढ, प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणूक, आवड व आरोग्य सोयीनुसार मूल्यवर्धित पदार्थाकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. ओमगा-३, ओमगा-६ फॅटी ऑसिड तंतुमय पदार्थाचा वापर, प्रथिनयुक्त पदार्थांचा वापर दुग्धजन्य पदार्थांत केल्यास दुधाचे मूल्यवर्धन चांगले होऊ शकते, त्यानुसार दुग्धजन्य पदार्थ तयार करावेत.

श्रीखंड

  • पेरूचा गर, स्ट्रॉबेरी गर, आंबा, अश्‍वगंधा रसाचा वापर करून मूल्यवर्धित श्रीखंड बनवता येते.
  • १४ टक्के पेरूचा गर व ३० टक्के साखर मिसळल्यास पेरूचा स्वाद असलेले श्रीखंड तयार होते.
  • १७ टक्के स्ट्रॉबेरी गर आणि ५ टक्के साखर वापरून स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवता येते.
  • २२ टक्के आंबा रस वापरून उत्तम स्वाद असलेले श्रीखंड बनवता येते.
  • ०.५० टक्के अश्‍वगंधा अर्क व ३० टक्के साखरेचा वापर करून हर्बल श्रीखंड तयार करता येते.

आइस्क्रीम
साधारणतः ५ टक्के ते ६ टक्के रामफळ आणि सीताफळाच्या गराचा वापर केल्यास उत्कृष्ट दर्जाचे आइस्क्रीम बनवता येते.

दही

  • दह्यामध्ये डाळिंबाचे दाणे, पेरूचा गर, सोया दुधाचा वापर केल्यास उत्कृष्ट दर्जाचे मूल्यवर्धित दही तयार करता येते.
  • दह्यामध्ये ६ टक्के पेरूचा गर, १० टक्के साखर मिसळून पेरूचे दही चांगल्या पद्धतीने बनवता येते.
  • विरजन लावतेवेळी दुधात १० टक्के डाळिबांचे दाणे मिसळून, त्यात ५ टक्के साखर मिसळून डाळिंबाचे दही नावीन्यपूर्ण प्रकारे ग्राहकाला देता येते.
  • ४० टक्के सोया दूध किंवा ६० टक्के गाई/म्हशीच्या दुधाचा वापर करून त्यात विरजन मिसळून चांगल्या दर्जाचे सोया दही बनवता येते.

लस्सी

  • लस्सीमध्ये आंबा रस, अननसाच्या गराचा वापर करून विविध फ्लेवरची लस्सी बनवता येते.
  • लस्सीमध्ये साधारणतः १० टक्के आंबा रस व १० टक्के साखर मिसळूण मिश्रण एकजीव केल्यास चांगल्या प्रकारे आंबा लस्सी तयार करता येईल.
  • लस्सीमध्ये अननस गर ५ टक्के आणि साखर ९ टक्के मिसळल्यास अननस लस्सी तयार होते.

बर्फी
बर्फी तयार करत असताना खव्यामध्ये आंबा गर १० टक्के, संत्रीगर १० टक्के, पपई गर १० टक्के व साखर ३० टक्के एकत्र केल्यास मूल्यवर्धित बर्फी तयार होते.
 
संपर्क ः एन. जी. देवशेटे, ९५०३५४९२७२
(के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक) 

News Item ID: 
18-news_story-1552997106
Mobile Device Headline: 
फळे, भाज्यांचा वापर करून दुग्धजन्य पदार्थांचे मूल्यवर्धन
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture story in marathi, value addition of milk products
Author Type: 
External Author
एन. जी. देवशेटे, के. आर. चौधरी
Search Functional Tags: 
दूध, साखर, सीताफळ, डाळिंब
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment