Tuesday, April 9, 2019

हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची निर्मिती

हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे. हळद मूळव्याध, मधुमेह या विकारावरही उत्तम औषध आहे. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व केन्फेक्शनरी उद्योगात वापरतात. जगातील एकूण उत्पादनापैकी ७६ टक्के हळद भारतात होते. भारतात प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते.  हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे. हळद मूळव्याध, मधुमेह या विकारावरही उत्तम औषध आहे. हळदीचा नैसर्गिक रंग अन्न, औषधी व केन्फेक्शनरी उद्योगात वापरतात. 

हळद पावडर

  • पावडर तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या वापर केला जातो. हळद पावडर तयार करण्यासाठी प्रथम जाड मोठ्या हळकुंडाचा इलेक्ट्रीक मोटारीवर चालणाऱ्या चक्की वजा यंत्रामध्ये भरडा केला जातो. यंत्रामध्ये भरडा पुढे जाऊन हळद पावडर तयार केली जाते. 
  • पावडर वेगवेगळ्या जाळीतून बाहेर पडून शेवटी ३०० मेश जाळी मधून बाहेर पडते. 
  • तयार पावडर ५,१०,२५ किलो आकाराच्या प्लॅस्टिक किंवा कापडी पिशवीमध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी पाठववी जाते.
घटक  स्पेशल स्टँडर्ड
ओलावा (जास्तीत जास्त) १०% १२ %
एकूण राख (जास्तीत जास्त) ७ % ९ %
आम्लामध्ये अविद्राव्य राख (जास्तीत जास्त) १.५ % १.५ %
कुरकुमीनॉइड (कमीत कमी) २ % २ %
स्टार्च (जास्तीत जास्त) ६० % ६० %

कुरकुमीन 

  • इथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून वाळलेल्या हळद पावडरपासून कुरकुमीन वेगळे काढतात. 
  • हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातीपरत्वे २ ते ६ टक्के इतके असते. 
  • कुरकुमीनपासून आयुर्वेदिक औषधे तसेच अनेक सौंदर्य प्रसाधने बनवितात.
  • जाती परत्चे कुरकुमीनचे प्रमाण बदलते. डी. टी. एस. २२२ या जातीमध्ये सर्वाधिक कुरकुमीनचे प्रमाण ५.२ टक्के इतके आढळून आले आहे. सेलम जातीमध्ये ४.५ टक्के कुरकुमीन असते.
  • वाळलेल्या हळदीचा पिवळेपणा कुरकुमीनमुळे दिसून येतो. अधिक कुरकुमीन असलेल्या हळदीस बाजारात चांगला दर मिळतो. 
  • ओल्या आंबे हळदीच्या कंदापासून उत्तम प्रकारचे लोणचे बनविता येते.

सुगंधी तेल 

  • हळद औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून सुगंधी तेल काढता येते. 
  • हळदीच्या ताज्या गड्ड्यापासून ५ ते ६ टक्के तेल मिळते. 
  • तेल नारंगी पिवळ्या रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते.
  • ळदीचे संप्लवनशील तेल
  • हळदीमध्ये ३.५ टक्के संप्लवनशील तेल असते. हे तेल पिवळ्या रंगाचे असून हे वेगळे काढण्यासाठी पाण्याच्या ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर करतात. हळदीच्या तेलात ६ टक्के टरमतेरोन्स व २५ टक्के झींगी बेरन असते.

कुंकू 

  • हळदीचे गड्डे मुख्यत:  कुंकू तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये टॅपिओका किंवा पांढऱ्या चिकणमातीचे खडे मिसळतात. त्यावर सल्फ्युरिक ॲसिड व बोरिक ॲसिडची प्रक्रिया करतात.
  •  हे मिश्रण वाळवून दळून काढले जाते. अशाप्रकारे हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक येथे आहेत.

रंगनिर्मिती 

  • लोकरी, रेशमी, सुती कपड्याला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. 
  • सध्या काही प्रमाणात सुती कपड्यांना हळदीचा रंग देतात. 
  • औषधे, कन्फेक्शनरी उद्योगात हळदीचा रंगासाठी उपयोग होतो. 
  • वॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होतो.

सौंदर्य प्रसाधने 

  • वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने, साबणांमध्ये हळदीच्या गुणधर्माचा उपयोग करतात. स्नानपूर्वी चेहऱ्याला व शरीराला हळद लावल्यास त्वचेला चकाकीपणा येतो. चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.
  • ओलिओरिझीन निर्मिती 
  • हळदीच्या भुकटीपासून ओलेओरिझीन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेने प्रमाणित केली आहे. 
  • रंग व स्वादाकरिता त्याचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थांमध्ये करतात, म्हणून त्याला चांगली मागणी आहे. याचे शेकडा प्रमाण ५ ते ७ टक्के असून त्यातील व्होलाटाईल तेलाचे प्रमाण १८ ते २० टक्के आहे.

औषधे निर्मिती 

  • आयुर्वेंदात हळदीचे कडू रसम उष्णवीर्य, रूक्ष, ब्रव्य, कृमीहर असे गुण सांगितले आहेत. 
  • औषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग करतात. 
  • हळद ही पाचक, कृमिनाशक, शक्तीवर्धक व रक्तशुद्ध करणारी आहे. 
  • मूत्राशय आजार व मूतखड्यासाठी हळदीचा उपयोग होतो. 
  • हळदीचे तेल जंतूनाशक आहे. 

 : शैलेंद्र कटके, ९९७०९९६२८२ 
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

News Item ID: 
18-news_story-1554825920
Mobile Device Headline: 
हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची निर्मिती
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in marathi, turmeric processing
Author Type: 
External Author
शैलेंद्र कटके, हेमंत देशपांडे
Search Functional Tags: 
हळद, मधुमेह, औषध, drug, भारत, चीन, आयुर्वेद, यंत्र, Machine, ओला, सौंदर्य, beauty, पंढरपूर, पूर, पुणे, नाशिक, Nashik, कृषी विद्यापीठ, Agriculture University
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment