सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागली आहे. बुधवारी (ता. ३) राजापुरी हळदीची ६१३६ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ६००० ते १३००० तर सरासरी ९५०० असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
गुळाची २०६३ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ३५६५ तर सरासरी ३१८३ रुपये असा भाव होता. परपेठी हळदीची २१३२ क्विंटल आवक झाली होती. परपेठी हळदीस ४५०० ते ९००० तर सरासरी ६७५० रुपये असा दर होता. लाल मिरचीची ७९ क्विंटल आवक झाली. लाल मिरचीस प्रतिक्विंटल ७००० ते ८००० तर सरासरी ७५०० रुपये असा दर मिळाला.
विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक ३७१० क्विंटल झाली होती. कांद्यास प्रतिक्विंटल ४५० ते ९५० रुपये असा दर मिळाला. बटाट्याची १०४९ क्विंटल आवक झाली. बटाट्यास प्रतिक्विंटल ६५० ते १३५० तर सरासरी १०५० रुपये असा दर होता. लसणाची ७५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ८५० ते १९०० तर सरासरी १३५० रुपये असा दर मिळाला.
आल्याची ७ क्विंटल आवक झाली असून, आल्यास प्रतिक्विंटल २५०० ते ६००० रुपये तर सरासरी ४५०० रुपये असा दर होता. संत्र्याची १२७५ डझनाची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १२५ ते ४५० रुपये असा दर मिळाला. मोसंबीची १५६० डझनाची आवक झाली होती. मोसंबीस प्रति दहा किलोस १०० ते ३५० रुपये असा दर होता. डाळिंबाची ६५०० डझन आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १५० ते ४५० रुपये असा दर मिळाला.
चिकूची १०४६४ डझनाची आवक झाली होती. चिकूस प्रति दहा किलोस १२५ ते २५० रुपये असा दर होता. सफरचंदाची १०१ पेट्यांची आवक झाली असून, सफरचंदाच्या प्रतिपेटीस ७५० ते १५०० रुपये असा दर मिळाला. आंब्याची ५१४७ पेटीची आवक झाली होती. आंब्याच्या प्रतिपेटीस १५०० ते ३००० तर सरासरी २५०० रुपये असा दर होता.

0 comments:
Post a Comment