Wednesday, June 26, 2019

प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची पचनीयता

निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यामध्ये वापरला तर जनावरांची शारीरिक वाढ, तसेच दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. कोरड्या चाऱ्यातील पोषणमूल्यांची वाढ करण्यासाठी युरियाचा वापर फायदेशीर ठरतो. त्यामुळे जनावरांना आवश्यक प्रथिने, ऊर्जा, खनिजे मिळतात.

जनावरांसाठी कोरडा चारा म्हणून कडबा, मका, गव्हाचे काड, भात काडाचा उपयोग केला जातो. यामध्ये पोषणमूल्ये थोड्याही प्रमाणात नसतात. त्यामुळे जनावरांची वाढ, प्रजननक्षमता, दूध उत्पादन कमी होते. परंतु जो निकृष्ट दर्जाचा चारा आहे त्यावर योग्य प्रक्रिया करून जनावरांच्या खाद्यात वापरला तर जनावरांची वाढ, दूध उत्पादन वाढण्यास मदत होईल. कोरड्या चाऱ्यातील पोषणमूल्यांची वाढ करण्यासाठी युरियाचा वापर फायदेशीर ठरतो. त्यामुळे जनावरांना आवश्यक प्रथिने, ऊर्जा, खनिजे मिळतात. प्रथिने ही अमिनो अॅसिडची बनलेली असतात. अमिनो अॅसिड हे दुधाचे प्रमाण वाढण्यासाठी मदत करते. आहारातून प्रथिने मिळण्यासाठी युरिया महत्त्वाचा आहे. ऊर्जेसाठी गिरणीतून वाया जाणारे पीठ किंवा गुळाचे मिश्रण आणि खनिजांसाठी खनिज मिश्रण, या सर्वांचे मिश्रण करून कडब्यावर फवारले, तर साहजिकच एक निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यापासून योग्य पद्धतीचा पोषणमूल्यवर्धित चारा तयार होतो.

चाऱ्यावर प्रक्रिया 

  •  १०० किलो वाळलेल्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३ किलो गूळ किंवा गिरणीतून वाया जाणारे पीठ, १ किलो खडे मीठ, २ किलो युरिया, १ किलो खनिज मिश्रण लागते. हे सर्व घटक ४० लिटर पाण्यामध्ये मिसळून मिश्रण तयार करावे.
  •  स्वच्छ जमिनीवर ताडपत्री अंथरून कुट्टी केलेल्या कडबा कुट्टीचा एक फूट थर होईल असा पसरावा. पसरलेल्या कडबा कुटीवर तयार केलेले मिश्रण समप्रमाणात सगळीकडे पसरावे.
  • मिश्रण शिंपडताना कडबा कुट्टी  खालीवर करून घ्यावी. जेणेकरून मिश्रण हे संपूर्ण कुट्टीमध्ये मिसळले जाते.  त्याबरोबर धुमसाने कुट्टी चांगली दाबून घ्यावी. जेणेकरून त्यामधील हवा निघून जाईल. कुट्टी साठवून ठेवण्यासाठी हवाविरहित असणे गरजेचे आहे. 
  •  कुट्टीचे थरावर थर रचून तयार केलेले मिश्रण शिंपडत राहावे. लगेच ही कडबा कुट्टी धुमसाने दाबत राहावी.  
  •  संपूर्ण कुट्टीवरती मिश्रण शिंपडून झाल्यावर ताडपत्रीने हवा घुसणार नाही या पद्धतीने व्यवस्थित झाकून ठेवावी. 
  •  हवाबंद केलेली कडबा कुट्टी २१ दिवसापर्यंत ठेवावी. त्यानंतर प्रक्रिया केलेली कुट्टी मोठ्या जनावरांच्या खाद्यामध्ये दररोज पाव किलो या प्रमाणात द्यावी. 
  • युरिया प्रक्रिया केलेली कुट्टी सहा महिन्यांखालील वासरांना, करडांना खाऊ घालू नये, कारण ६ महिन्यांपर्यंत त्यांचे  पोट (रुमेन) हे पूर्णपणे विकसित झालेले नसते. त्यामुळे हा चारा पचवणासाठी लहान जनावरे, वासरे ही सक्षम नसतात.
  •  युरिया प्रक्रिया केलेला हा चारा गाभण तसेच आजारी जनावरे, ज्यांना पोटाचे विकार चालू आहेत अशा जनावरांना देऊ नये. कारण त्यांना प्रक्रिया केलेला चारा पचण्यास अवघड जाते.

 प्रक्रियेचे फायदे 

  •    चारा कमतरतेच्या काळात उपयुक्त. 
  •    वाळलेल्या चाऱ्यामध्ये  पचनास अवघड असलेले घटक जसे की तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. युरिया प्रक्रिया या सगळ्या अपचनीय पदार्थांचे रूपांतर पचनीय पदार्थामध्ये करतात. 
  •    वाळलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप कमी असते. युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिन्यांचे प्रमाण १ ते १.५ टक्क्यापासून ७ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढते. पचनीय क्षमता ही ४२ टक्क्यांपासून ५६ ते ६० टक्क्यांपर्यंत वाढते.
  •    प्रक्रियेमुळे जनावरांच्या दूध उत्पादनात निश्चितच वाढ होते. त्यांची शारीरिक वाढ, प्रजनन क्षमता ही सुरळीत राखली जाते. 

- डॉ. मंजूषा ढगे, ९०६७०३७२०३
(पशुपोषणशास्त्र विभाग, पशुवैद्यक महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

News Item ID: 
18-news_story-1561544988
Mobile Device Headline: 
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची पचनीयता
Appearance Status Tags: 
Tajya News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture news in Marathi, article regarding improvement in cattle dry fodder
Author Type: 
External Author
डॉ. मंजूषा ढगे
Search Functional Tags: 
दूध, विभाग
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment