जळगाव ः खानदेशात केळीचे दर महिनाभरापासून दबावात असून, जाहीर दरांपेक्षा क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपये शेतकऱ्यांना कमी दिले जात आहेत. निर्यातक्षम केळीचे दर क्विंटलमागे १००० रुपयांवर असले तरी कमी दर्जाच्या केळीला हवे तसे दर मिळत नसल्याने केळी उत्पादक अडचणीत आले आहेत.
उत्तर भारतात केळीची मागणी कमी झाली आहे. रावेरात काही शेतकऱ्यांची केळी तीनशे रुपये क्विंटलने खरेदी करण्यासही व्यापारी तयार नाही. बाजार समितीने जाहीर केलेल्या भावात केळी न घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केली आहे. शेतकरी, व्यापारी यांच्या बैठका झाल्या. मागील आठवड्यात शेतकऱ्यांनी केळी दरांसाठी मोर्चाही काढला; परंतु दरांचा तिढा कायम आहे. रमजान ईदपूर्वी केळीचे दर तेजीत होते. मे महिन्याच्या मध्यात दर्जेदार केळीला १४१० रुपये क्विंटल दर होते; परंतु जसा रमजान महिना आटोपला तसे दर कमी होण्यास सुरवात झाली. रावेर बाजार समिती सध्या नवती केळीला एक हजार रुपये प्रतिक्विंटल असे दर जाहीर करीत आहे. पिलबाग केळीला ९०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर जाहीर होत आहेत; परंतु या जाहीर दरात केळीची खरेदी केली जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
उष्णतेचा परिणाम
सध्या उत्तर भारतात ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्याने तेथील केळी पिकवणी केंद्रचालक, मोठे व्यापारी खानदेशातून केळीची मागणी करीत नाहीत. दुसरीकडे रावेरात मागील वर्षी जुलैमध्ये लागवड केलेल्या केळी बागांमधून काढणी वेगात सुरू आहे. केळी नाशवंत असल्याने अधिक दिवस काढणी प्रलंबित ठेवता येत नाही. आवक वाढली आहे. रावेरात सध्या प्रतिदिन ३०० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक होत आहे; तर केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजारात साडेतीनशे ट्रक केळीची आवक मागील १०-१२ दिवसांपासून प्रतिदिन सुरू आहे. जेवढी आवक होते तेवढी मागणी दिल्ली, पंजाब, काश्मीर बाजारातून नाही. छत्तीसगड, नागपूर, राजस्थानमधील केळी पिकवणी केंद्रचालकांना दर्जेदार केळी देण्याची वेळ काही एजंटवर आली आहे, अशी माहिती मिळाली.

0 comments:
Post a Comment