इगतपुरी - इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांसह आदिवासी भागातील भातशेतीसह इतर पिकांच्या लागवडीसाठी बळीराजाची लगबग सुरू झाली आहे. पेरणीसाठी लागणारे शेतीपूरक साहित्य, बी-बियाणे व खतांच्या खरेदीत शेतकरी व्यस्त आहेत.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत आजही फारशी बागायती शेती नसल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामावर अवलंबून राहावे लागते. रोजगारानिमित्त स्थलांतरित झालेले अल्पभूधारक शेतकरी पावसाळ्याच्या तोंडावर गावी परतत असतात. रोजगारातून मिळविलेल्या पैशांतून शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते यांबरोबरच घरावर आच्छादन टाकण्यासाठी प्लॅस्टिक कागद खरेदी करण्यासाठी इगतपुरी, घोटी, हरसूल व त्र्यंबकेश्वर येथील बाजारपेठांत गर्दी दिसून येते. खरीप हंगामात भाताबरोबरच नागली, भात, वरई, खुरासणी, उडीद आदी खरीप पिके घेतली जातात. आदिवासी तालुक्यातील शेतकरी आता पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करू लागला आहे. पारंपरिक बियाण्यांऐवजी आता कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या भाताच्या जातींचा समावेश करण्यात येऊ लागला आहे. भाताच्या नवीन वाणांची मागणी असल्याने बियाणे कंपन्यांनी विविध भात बियाणे बाजारात विक्रीसाठी दाखल केले आहेत.
प्लॅस्टिक कागदाला मागणी
इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील लहान-मोठ्या खेड्यांवर कच्च्या घरांची संख्या अधिक असल्याने पावसाळ्यात घरांची दुरुस्ती केली जाते. यासाठी कौले व पत्र्यांच्या घरावर प्लॅस्टिक कागद टाकण्यात येतो. त्यामुळे बाजारात प्लॅस्टिक कागद खरेदीसाठी मोठ्या संख्येने गर्दी होते. शिवाय पावसापासून संरक्षण होण्यासाठी विविध प्रकारच्या रंगीबेरंगी घोंगड्या बाजारात दाखल झाल्या आहेत.

0 comments:
Post a Comment