खरीप हंगामात कापूस, मका, ज्वारी, ऊस आणि मिरची या पिकांची लागवड केली जाते. या पिकांचे किडीमुळे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने किडींना प्रतिबंध व व्यवस्थापन करता येते.
कापूस
गुलाबी बोंड अळी
- शेतातील पिकांचे अवशेष वेचून नष्ट करावेत. शेत स्वच्छ ठेवावे.
- कपाशीची पेरणी शक्यतो एकाच वेळी करावी. पूर्वहंगामी किंवा फार उशिरा लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीसाठी अन्न मिळत राहते. त्यांची संख्या वाढू शकते.
- कपाशीच्या पिकांची तृणधान्य किंवा कडधान्य पिकाबरोबर फेरपालट करावी किंवा आंतरपिक घ्यावे.
- आश्रयात्मक ओळी लावावे. कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केलेले बियाणे वापरावे.
मका
लष्करी अळी
- हंगाम संपल्यानंतर पिकाचे शिल्लक अवशेष नष्ट करावेत.
- जमिनीची खोल नांगरट करावी.
- पेरणी वेळेवर करावी. टप्प्याटप्प्याने पेरणी टाळावी.
- शेततणमुक्त ठेवावे. रासायनिक खताचा अतिरेकी वापर टाळावा.
- मक्यामध्ये तूर किंवा मूग यांचे आंतरपीक घ्यावे.
- सायअॅन्ट्रानिलीप्रोल (१९.८ टक्के) अधिक थायामेथोक्झाम (१९.८ टक्के) हे संयुक्त कीटकनाशक ४ मिलि प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
ज्वारी
खोडमाशी, मिजमाशी
- जमिनीची खोल नांगरट करून काडी, धसकटे वेचून शेत साफ ठेवावे.
- खोडमाशी नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (७० डब्ल्यू एस) किंवा (४८ एफएस) १० मिलि प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सर्व शेतकऱ्यांनी शक्यतो एकाच वेळी आठवड्याच्या आत पेरणी केल्यास मिजमाशीपासून संरक्षण होते.
ऊस
हुमणी
- जमिनीची खोल नांगरट करावी. नांगरणी केल्यानंतर उघडे पडलेले सुप्त अवस्थेतील प्रौढ भुंगेरे वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात मिसळून त्याचा नायनाट करावा.
- पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.
- झाडाच्या फांद्या हलवून खाली पडलेल्या भुंगेऱ्यांचा बंदोबस्त करावा.
- शेतकऱ्यांनी ७.३० ते ८.३० या काळात प्रकाश सापळे लावून त्यात अडकणाऱ्या भुंगेऱ्यांचा नायनाट करावा. मेटारायझिम अॅनिसोप्ली या जैविक घटकांचा १० किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात जमिनीतून वापर करावा.
मिरची
रस शोषण करणाऱ्या किडी, फळ पोखरणारी अळी
- शेतात मागील पिकाचे अवशेष काढून टाकावे.
- कीड प्रतिकारक किंवा सहनशील वाण, उदा. पुसा ज्वाला किंवा फुले ज्योती यांचा वापर करावा.
- निरोगी रोपाची लागवड करावी.
- पीक लागवडीपूर्वी दहा दिवस अगोदर मिरची पिकाच्या चहूबाजूला २-३ ओळी ज्वारी पेरावी.
- निंबोळी पेंड १०० किलो प्रति एकरी या प्रमाणात दोनदा (रोप लावतेवेळी व एक महिन्यानंतर) विभागून द्यावी. थायामिथोक्झाम (७० डब्ल्यूएस) ७ मिलि प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी.
- एस. सी. बोकन (पी.एच.डी. स्कॉलर), ९९२१७५२०००
- डॉ. पी. आर. झंवर (विभागप्रमुख), ७५८८१५१२४४
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

0 comments:
Post a Comment