- स्थानिक नाव : हुम्भ, हुंब, ठोस्का
- शास्त्रीय नाव : Miliusa tomentosa (Roxb.) Sinclair
- कूळ : Annonaceae
- इंग्रजी नाव : Tomentose Miliusa, Hoom
- उपयोगी भाग : कोवळी पाने, फुले, पिकलेली फळे
- उपलब्धीचा काळ : कोवळी पाने:- मार्च-एप्रिल, फुले:- एप्रिल-मे,
- पिकलेली फळे :- मे-जुलै
- झाडाचा प्रकार : झाड
- अभिवृद्धी : बिया
- वापर : पिकलेली फळे
आढळ
- हुम्भची पानझडी झाडे संपूर्ण राज्यात आढळतात. डोंगराळ भागातील घनदाट जंगलात तसेच शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला व देवराईच्या भागात हुम्भची झाडे मोठ्या प्रमाणात वाढतात.
- वनस्पतीची ओळख
- पानझडी झाडे साधारण १५ ते २० सें.मी. उंच वाढतात. झाडाची साल गडद करड्या रंगाची असून, उभ्या भेगायुक्त असते.
- कोवळ्या सालीवर बारीक, तपकिरी रंगाची लव असते. पाने जाड, गडद हिरव्या रंगाची, अंडाकृती आकाराची असून, ५ ते १० सें. मी. लांब व २ ते ५ सें. मी. रुंद, वरून मऊ खालून बारीक लवयुक्त व टोकाशी बोथट किंवा टोकदार, पानाच्या कडा दातेरी असतात.
- पाने कोवळी असताना लवदार व कालांतराने गुळगुळीत होतात. पानाचे देठ मजबूत ०.२ ते ०.६ सें. मी. लांबीचे असते.
- फुले द्विलिंगी, पानाच्या किंवा फांदीच्या बगलेतून एकाकी किंवा २ ते ३ येणारी व खाली लोंबकळणारी, हिरवट पिवळ्या रंगाची. पाकळ्या ६ व प्रत्येक पाकळीत एक चॉकलेटी रंगाची रेष असते. फुले गडद तपकिरी रंगाच्या लवयुक्त असतात.
- फुलांचे देठ ५ ते ७ सें. मी. लांब. फळे ३ ते ४ घोसात येणारी असतात. फळे गोल, हिरव्या रंगाची ५ ते १० एकत्रित घोसात येणारी, ४ ते ५ सें. मी. व्यासाची, फळांचे देठ १ ते १.५ सें. मी. लांब असते. पिकल्यावर गडद जांभळ्या रंगाच्या बिया होतात.
- फेब्रुवारी-मार्चमध्ये झाडाची पूर्ण पाने गळून जातात. फुले एप्रिल ते मेमध्ये येतात. फळे मे ते जुलैदरम्यान तयार होतात.
औषधी उपयोग
- बाळंतपणानंतर अंगावरील सूज कमी करण्यासाठी कच्च्या वाळलेल्या हुम्भच्या फळांची जाडसर पावडर करून त्याचा वाफेरा दिवसातून एकवेळा बाळंतिणीला शेकण्यासाठी देतात.
- सालीपासून तयार केलेला काढा हगवणीपासून आराम पडण्यासाठी उपयुक्त आहे.
- अशक्तपणा कमी करण्यासाठी लहान मुलांना ताजी फळे खाण्यासाठी दिली जातात.
इतर उपयोग
- पिकलेली आंबट गोड फळे खाण्यासाठी वापरतात.
- लाकूड अतिशय कडक व मजबूत असल्यामुळे त्याचा वापर घरातील साहित्य, दरवाजे व खिडक्या, छपराचे वासे बनविण्यासाठी, तसेच शेतीची अवजारे बनविण्यासाठी केला जातो.
पाककृती
कोवळ्या पानाची व फुलांची भाजी
साहित्य : २ ते ३ वाट्या हुम्भची कोवळी पाने किंवा फुले, १ मोठा बारीक कापलेला कांदा, १ ते दीड चमचा हिरवी मिरची व लसूण पेस्ट किंवा २ कापलेल्या हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, जिरे, मोहरी, तेल, चवीपुरते मीठ.
कृती : कोवळी पाने/ फुले निवडून स्वच्छ धुऊन कापून घ्यावी. फुलांची फक्त देठे काढून घ्यावीत. एका पातेल्यात पाणी गरम करून पाला/फुले वाफवून व पिळून घ्यावी. एका कढाईत तेल गरम करून जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्यावी, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची-लसूण पेस्ट परतून घ्यावी. नंतर त्यात वाफवून पिळून घेतलेली पाने/फुले मोकळी करून चांगले परतवून घ्यावे. पाच मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. चवीनुसार मीठ मिसळावे.
इमेल - ashwinichothe7@gmail.com
(क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)

0 comments:
Post a Comment