अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतशिवारात लगबग वाढली आहे. यामुळे बाजारपेठेत धान्याची आवक कमी झाली आहे. मंगळवारी (ता. दोन) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाच्या दरात किंचितशी वाढ झालेली दिसून आली. मूग कमीत कमी ३५०० व जास्तीत जास्त ५४०० रुपये दराने विक्री झाला. सरासरी ४४५० रुपये दर होता. आवक मात्र २५ क्विंटल झाली होती.
सोयाबीनची ७६० क्विंटलची आवक होती. कमीत कमी ३३५० व जास्तीत जास्त ३६२५ रुपये प्रतिक्विंटल होता. सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता.
बाजारात हरभऱ्याची आवक २९७ क्विंटलची झाली होती. हरभरा ३६०० ते ४१६० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. सरासरी ३९०० रुपयांचा दर होता. तूर सरासरी ५६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. ३२२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तुरीला कमीत कमी भाव ४५०० व जास्तीत जास्त ५७०० रुपये दर होता.
ज्वारीची ३१ क्विंटल आवक झाली होती. ज्वारीचा प्रतिक्विंटल १६०० ते २१००, तर सरासरी १८५० रुपये असा दर होता. गहू १७५० ते २००० रुपये दरम्यान विक्री झाला. आवक १२७ क्विंटल झाली होती. उडदाच्या दरात सातत्याने घसरण दिसून येत आहे. गेल्या महिन्यात कमीत कमी ४७०० व जास्तीत जास्त ५००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळालेला उडीद मंगळवारी कमीत ४६०० व जास्तीत जास्त ४८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. सरासरी ४७०० रुपये दर होता. १४ क्विंटल आवक होती. पेरणीच्या लगबगीमुळे बाजारपेठेतील आवकेवर सध्या परिणाम झालेला आहे. असे असतानाही दरांमध्येही फारशी तेजी नसल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.

0 comments:
Post a Comment