जळगाव : जिल्ह्यात केळीचे आगार म्हणून ओळख असलेल्या रावेर, मुक्ताईनगर भागांतील केळीची उपलब्धता कमी झाल्याने आवक कमी झाली आहे. यातच दुर्गोत्सवामुळे केळीची स्थानिक बाजारासह उत्तरेकडे मागणी वाढली असून, चोपडा, जळगाव, पाचोरा भागांतील कांदेबाग केळीला १६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत.
सध्या खानदेशात जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर भागांत केळीची आवक कमी आहे. रावेरातून सुमारे १०० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) आवक घटली आहे. या भागात पिलबागांमधून केळीची काढणी सुरू आहे. दर्जेदार केळीसंबंधी प्रसिद्ध असलेल्या तापीकाठावरील भागांतील आवक कमी आहे. नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा भागांतही केळीची आवक कमी आहे. चोपडा, जळगाव व पाचोरा भागांत कांदेबाग केळीमध्ये काढणी सुरू आहे. दुर्गोत्सव सुरू होताच उत्तर भारतासह स्थानिक बाजारातून केळीला उठाव वाढला आहे.
राज्यातील कल्याण, ठाणे, पुणे, नागपूर या भागांतूनही मागणी आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात सर्वत्र मिळून २५० ट्रक केळीची आवक सुरू आहे. दर्जेदार केळीला जादा दर मिळत असून, रविवारी (ता. २९) कमाल १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. चोपडा व जळगावमधील तापीकाठानजीकच्या भागात पारंपरिक वाणांद्वारे उत्पादित दर्जेदार केळी आहे. तसेच, उतिसंवर्धित बागांमध्येदेखील उत्तम केळी तयार होत आहे. या भागात उत्तरेकडील मोठे खरेदीदार सावदा (ता. रावेर), फैजपूर (ता. यावल), चोपडा भागातील एजंटच्या माध्यमातून केळीची खरेदी करून घेत आहेत. १३ व १५ किलो क्षमतेच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून केळीची पाठवणूक उत्तरेकडे ट्रकद्वारे सुरू आहे.
केळीचे दर मध्यंतरी १३०० रुपयांपर्यंत होते. परंतु, जसा तुटवडा वाढू लागला व मागणी सुरू झाली, तशी दरांमध्ये सुधारणा झाली. मागील २० ते २५ दिवसांमध्ये दर क्विंटलमागे सुमारे २८० रुपयांनी वधारले आहेत.

0 comments:
Post a Comment