नागपूर : बाजारात हंगामातील नव्या सोयाबीनची आवक सुरू झाल्याने काहीसा उत्साह आहे. ही आवक एक हजार क्विंटलच्या आसपास असून दर २५०० ते ३५०० रुपये क्विंटल असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
कळमणा बाजार समितीत नव्या सोयाबीनची आवक होण्यास सुरवात झाली आहे. येत्या काळात आवक वाढण्याचा अंदाज आहे. सोयाबीनच्या दरातही चढउतार आहेत. आर्द्रतेच्या प्रमाणानुसार सोयाबीनला दर दिला जात आहे. बाजारात गव्हाची ३९८ क्विंटलची आवक झाली. दर २००० ते २०६८ क्विंटलचे आहेत.
हरभरादेखील बाजारात नियमित येत असून सरासरी आवक ३०० ते ३५० क्विंटलची आहे. हरभऱ्याचे व्यवहार गेल्या आठवड्यापासून ३६०० ते ४२०० रुपये क्विंटलने होत असल्याने दर स्थिर आहेत.
तूर ४७०० ते ५२५१ क्विंटलने खरेदी होत असून आवक जेमतेम आहे. ती सरासरी ७० क्विंटल झाली. केळीची अल्पशी सात ते २५ क्विंटलची आवक, तर दर ४५० ते ५५० रुपयांवर स्थिर आहेत. द्राक्षाची दोन क्विंटलची आवक झाली. दर ५००० ते ६००० रुपये क्विंटलचा मिळाला.
संत्रा, मोसंबीची आवक सुरू आहे. संत्र्याची आवक ४३ क्विंटल असून दर २२०० ते २६०० रुपये आहेत. मोठ्या मोसंबीची देखील दहा क्विंटल आवक झाली. ४३०० ते ४८०० रुपये क्विंटलचा दर तिला होता.

0 comments:
Post a Comment