वेलतूर, नागपूर - गरिबांच्या झोपडीचा आधार असलेला बांबू मीनाक्षीने कल्पकतेचा नवाधार देत सातासमुद्रापार धनिकांच्या दिवाणखान्यात पोचविला आहे. सध्या तिच्या बांबूकलेने कलाप्रेमींना मोठे वेड लावले आहे.
मीनाक्षी साकारत असलेल्या बांबूच्या कलात्मक वस्तू आजघडीला साऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. तिच्या या असामान्य कलेमुळे ती महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर मीनाक्षी मुकेश वालके यांना बांबूकन्या वा ‘बांबू वुमन’ म्हणून ओळख मिळाली आहे. पारंपरिक बुरड कारागीर बांबूपासून बनवीत असलेल्या टोपल्या, सूप, परड्या, हारे यांना बगल देत बांबूपासून शोभिवंत वस्तू साकारून मीनाक्षीने त्याला आधुनिक ‘ग्लॅमर’ दिले. त्यापासून अनेक नावीन्यपूर्ण वस्तू साकारून साऱ्यांना आश्चर्यचकित केले. दागिने, मूर्ती, म्युरल, झुंबर, पेंटिंग, खेळणी, राख्या, आणखी काहीकाही नाही ते तिने अद्वितीय असे त्यातून साकारून पर्यावरण राखण्यासाठी प्रयत्न चालविले. हे प्रयत्न आता चळवळ झाली. महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेशातही तिच्या कलेची ‘वाहवाह’ होत आहे. तेथील स्वयंसेवी संस्था तिच्या कलेच्या प्रदर्शनासह प्रशिक्षण वर्गाचेही आयोजन करीत आहेत. महिला मंडळ, बचतगट, ग्रामीण कारागीर संघासाठी तिचे काम मोठेच प्रेरणादायी ठरले आहे. त्यातून तिने ग्रामीण रोजगाराचे नवे दालन खुले केले असल्याने ती सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.
सुरवातीपासूनच बांबू हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. शेतीसाहित्यासह घरगुती वापरातील अनेक वस्तू बांबूपासून बनविलेल्या जातात. मात्र, त्या अलीकडे आधुनिकतेत हरविल्या होत्या. त्या आधुनिक जीवनशैलीत पुनर्स्थापित करण्याचा मीनाक्षीचा हा प्रयत्न असल्याचे ती सांगते.कलाविष्काराचे नवे साधन कलेच्या प्रांतात बांबूच्या रूपाने पुढे आल्याची भावना कलाप्रेमी व्यक्त करीत असून त्यांचे श्रेय ते मीनाक्षीला देत आहेत. अभिसार इनोव्हेशन, चंद्रपूरच्या माध्यमातून बांबूकला प्रसारणाचा महत्त्वाचा कार्यभाग साधल्या जात आहे, हे विशेष.
बांबू हा सुरवातीपासून महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन झाले आहे. बांधकामासाठी व घरगुती कामासाठी त्याचा उपयोग माहीत होता. त्यापासून तयार होणारे हे कलाकुसरीचे साहित्य वेड लावणारे आहे. त्याच्या प्रचारप्रसाराचे कार्य सर्व स्तरावर झाले पाहिजे.- आकाश भोयर, सामाजिक कार्यकर्ते

0 comments:
Post a Comment