Thursday, October 17, 2019

मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये दर

जळगाव  ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेली कापूस खरेदी विविध खेड्यांवर जेमतेम अशीच सुरू आहे. यातच ओल्या मालाच्या नावाने कापसाची अनेक भागात ३१०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणे खरेदी होत आहे. दुसरीकडे खेतिया (जि. बडवानी, मध्य प्रदेश) येथील बाजारात मागील आठवड्यात चांगल्या कापसाला ५४०० रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर लिलावात मिळाला. 

खेतिया बाजारपेठेत दर वधारल्यास त्याचा सकारात्मक परिणाम चोपडा, शिरपूर (जि. धुळे), यावल, जळगाव, धरणगावपर्यंत पोचतो. चोपडा तालुक्‍यात सध्या खेडा खरेदीत (थेट गावात जाऊन खरेदी) ३१०० ते ४५०० रुपये दराने कापसाची खरेदी होत आहे. कोरड्या मालाचे दर अनेक भागात सुधारले असून धरणगाव, जळगाव, बोदवड, जामनेर भागातील जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू झाले आहेत. कापसाचे दर किमान ५००० ते ५२०० रुपये जागेवरच किंवा खेडा खरेदीत मिळावेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण आता दर्जेदार, कोरडा कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत आहे. 

News Item ID: 
18-news_story-1571315743
Mobile Device Headline: 
मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये दर
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

जळगाव  ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेली कापूस खरेदी विविध खेड्यांवर जेमतेम अशीच सुरू आहे. यातच ओल्या मालाच्या नावाने कापसाची अनेक भागात ३१०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणे खरेदी होत आहे. दुसरीकडे खेतिया (जि. बडवानी, मध्य प्रदेश) येथील बाजारात मागील आठवड्यात चांगल्या कापसाला ५४०० रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर लिलावात मिळाला. 

खेतिया बाजारपेठेत दर वधारल्यास त्याचा सकारात्मक परिणाम चोपडा, शिरपूर (जि. धुळे), यावल, जळगाव, धरणगावपर्यंत पोचतो. चोपडा तालुक्‍यात सध्या खेडा खरेदीत (थेट गावात जाऊन खरेदी) ३१०० ते ४५०० रुपये दराने कापसाची खरेदी होत आहे. कोरड्या मालाचे दर अनेक भागात सुधारले असून धरणगाव, जळगाव, बोदवड, जामनेर भागातील जिनिंग प्रेसिंग कारखाने सुरू झाले आहेत. कापसाचे दर किमान ५००० ते ५२०० रुपये जागेवरच किंवा खेडा खरेदीत मिळावेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण आता दर्जेदार, कोरडा कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत आहे. 

English Headline: 
Agriculture news in marathi; Madhya Pradesh market Cotton cost Rs 5400
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
जळगाव, कापूस, खेड, मध्य प्रदेश, धुळे
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment